निवडणूक निकालापूर्वीच विश्वासनामा सत्यात उतरविण्याचे पहिले पाऊल -विवेक कोल्हे
संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि गोदामाई प्रतिष्ठानचे गोदावरी स्वच्छता अभियान
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
रविवारी सकाळी गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी युवानेते विवेक कोल्हे,गोदावरी नदी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे,भाजपा मित्रपक्षांचे उमेदवार पराग संधान व विविध प्रभागातील उमेदवार यासह मोठ्या संख्येने युवासेवक आणि गोदासेवक उपस्थित होते.
कोपरगाव शहर आणि तालुक्याला गोदावरी किनारा लाभला आहे.आपले शहर नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे.या भूमिकेतून आम्ही सर्वांच्या आलेल्या सूचनेतून विश्वासनामा साकारला होता ज्याची पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे.आज निवडणूक जरी पुढे गेली असेल पण जनमतातून आलेल्या सूचना पूर्ण करण्यासाठी आम्ही कृतिशील पाऊल टाकले आहे.निवडणूक आणि राजकारण या पलीकडे जाऊन असणारी सामाजिक बांधिलकी आम्ही जपत आलो आहोत.येत्या २० तारेखाला जो भरीव मतरुपी विश्वास आमच्यावर जनता टाकणार आहे त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली असून आजच विश्वासपूर्तीच्या दृष्टीने काम देखील सुरू केले आहे त्याचेच हे पहिले पाऊल आहे अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी दिली आहे.
यावेळी पराग संधान यांनी नदी संरक्षक भिंत, बोटिंग सुविधा, जॉगिंग ट्रॅक, लेझर शो,धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीपट व सुशोभीकरण यासाठी आम्ही भूमिका घेतलेली असून त्या दृष्टीने काम सुरू केले आहे.आमचे सहकारी आणि आम्ही अनेकदा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी असतो.
आदिनाथ ढाकणे यांनी युवा नेते विवेक कोल्हे आणि त्यांचे सर्व सहकारी नदी स्वच्छता मोहिमेत सोबतीला आल्याने मोठे काम होईल.त्यांच्याकडे असणारे व्हिजन आणि अभ्यास यातून हा गोदातीर सुशोभित करण्यात येईल हा विश्वास आहे.आगामी काळात ही सक्षम टीम चांगले काम करेल यासाठी गोदामाई आशीर्वाद देईल अशी भावना व्यक्त करून गोदावरीचे महत्व विषद करून स्वच्छता मोहिमेची सामूहिक शपथ सर्वांनी घेतली.
गोदाकाठ स्वच्छता करत यावेळी तीरावर असणाऱ्या काटेरी झुडूपांची स्वच्छता करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.गोदापात्रात जाणारे मलमिश्रित आणि गटाराचे पाणी यामुळे नदी प्रदूषित होते त्यावर जलप्रक्रिया करणारे धोरण विश्वासनामा मध्ये आहे.गोदाघाटासह कुंभमेळा काळात कोपरगाव एक महत्वाचे केंद्र ठरावे यासाठी या विविध संकल्पना सत्यात उतरणे काळाची गरज ठरणार आहे.
यावेळी पराग संधान, वैभव आढाव, वैभव गिरमे, जितेंद्र रणशूर, मयूर गायकवाड, कलविंदर दडीयाल, संतोष शिंदे, सनी वाघ, संजय उदावंत, राहुल खरात, अनिल आव्हाड, दत्तू भाऊ पगारे, दीपक जपे, निलेश बोराडे, पैलवान, कैलास सोमासे, रोहित कनगरे, अभिषेक मंजुळ, ऋषिकेश गायकवाड, सतीश चव्हाण, गौतम रणशूर, राहुल रणशूर, शाहरुख शेख, आकाश डोखे, कैलास सोनवणे, आप्पा नवले, सोमनाथ पाटील, संदेश शेजवळ, जनार्दन सुपेकर, प्रज्वल आदिनाथ ढाकणे, रोहन दरपेल आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





