मुस्लिम समाज राजेंद्र झावरे यांच्यामागे खंबीर पणे उभा -- जिल्ह्यप्रमुख इरफान शेख
कोपरगाव समाचार :- मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम राजेंद्र झावरे यांनी केले असून शब्द पूर्ण करणारा माणूस त्यांनी ओळख निर्माण केली.ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा त्यांनी बांधला त्याच्या पायथ्याशी व्यवसाय करणाऱ्या विस्थापित टपरीधारक मुस्लिम समाजाला 50 वर्ष दोन्ही नेत्यांनी न्याय दिला नाही त्याच मुस्लिम समाजाला प्रस्थापित करत गाळे देत खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम झावरे यांनी केले असल्यामुळे मुस्लिम समाज त्यांच्यामागे खंबीर पणे उभा असल्याचे प्रतिपादन वाहतूक सेनेचे जिल्ह्यप्रमुख इरफान शेख यांनी केले आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे व प्रभाग क्र एक व दोन चे उमेदवार गायकवाड स्नेहा जनार्धन, आवारे दादा रखमाजी,पवार योगेश छबुलाल, शेख फमिदा हसम यांच्या प्रचारार्थ खडकी येथे आयोजित कॉर्नर सभेत इरफान शेख बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल तिपायले होते.यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे,महिला जिल्हा प्रमुख विमल पुंडे, किरण खर्डे, इरफान शेख, दत्ता पुंडे, बाबुराव पवार, विकास शर्मा,विशाल झावरे, राहुल देशपांडे, दिलीप सोनवणे,ऍड. शंकर यादव, अभिजित जाधव, अमजद शेख, दिगंबर गवळी, संतोष झावरे, रवी पवार, रवी आठरे, वैभव चव्हाण, बंटी बोर्डे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना इरफान शेख म्हणाले की, राजेंद्र झावरे यांच्यासारख्या नेत्याने नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यांचेच प्रतीक म्हणून मुस्लिम समाजाला शाळेसाठी वर्ग पाहिजे असतांना जुन्या सायन्स कॉलेज येथे उर्दू शाळेला 8 वर्ग दिले, शहरतील मुस्लिम समाजाला दफन भूमिसाठी जागा कमी पडत असल्याची मागणी स्व. शहर प्रमुख याकूब शेख यांनी केली असता राजेंद्र झावरे यांनी त्यांची ती मागणी पूर्ण करत नवीन दफन भूमीच मंजूर करून दिली आहे. रिक्षासेनेत 50 टक्के सभासद मुस्लिम समाजाचे सामावून घेत सी.बी.एस मज्जीद साठी जागा उपलब्ध करून देण्याचे काम झावरे यांनी केले आहे.
तसेच कोपरगाव शहरांत दंगल झाल्यावर सर्वात मोठी झळ ही बांगडी चाळ येथील व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम समाजाला पोहोचत असायची मात्र झावरे नगराध्यक्ष झाले असताना त्यांनी सर्वात प्रथम संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज व्यापारी संकुल करत त्या ठिकाणी असलेल्या विस्थापित टपरीधारक बांगडी चाळीतील मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय व्यावसायिकांना पक्के गाळे उपलब्ध करून दिले त्यामुळे आमगी निवडणुकीत झावरे यांच्या मागे मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय बांधव खंबीर पणे साथ देण्यासाठी उभे असून नगराध्यक्ष पदी त्यांना विराजमान करण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत असल्याचेही इरफान शेख म्हणाले.
50 वर्ष नगर पालिका, आमदारकी, खासदार, मंत्री पदे भोगून देखील आपल्या कोपरगाव शहराचा विकास प्रस्थापित काळे-कोल्हे व त्यांच्या उमेदवारांना करता आला नाही. तरी देखील आता विकास करू म्हणतं आम्हाला निवडून द्या असे म्हणण्याची वेळ यांच्यावर आली आहे. ह्या नेत्यांना विकास करायचा नाही तर टक्केवारी साठी साठी पालिका पाहिजे आहे.पन्नास वर्षात फक्त काळे -कोल्हे यांनी एकमेकांची जिरवा जिरवी केलेली आहे. बाकी त्यांनी काहीही केले नाही.
-राजेंद्र झावरे.





