banner ads

सुमित कोल्हे स्टार एज्युकेशन अवार्ड पुरस्काराने सन्मानित

kopargaonsamachar
0

 

सुमित कोल्हे स्टार एज्युकेशन अवार्ड पुरस्काराने सन्मानित


           
कोपरगांव समाचार : -


संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त   सुमित कोल्हे यांना एज्युकेशन सप्लाय अँड  फ्रांचाईसी एक्स्पो (इएसएफई) आणि टाईम्स ऑफ  इंडिया वर्तमानपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने बाॅम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई येथे शानदार सोहळ्यात  त्यांच्या शैक्षणिक  योगदानाबध्दल ‘स्टार एज्युकेशन अवार्ड २०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्रात शैक्षणिक  कार्याची दखल म्हणुन मानल्या जातो.

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुमित कोल्हे यांचे अभिनंदन केले आहे.


सुमित कोल्हे यांच्या पुढाकाराने संजीवनीत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.यात प्रामुख्याने अत्याधुनिक प्रयोगशाळा , डीजिटल क्लासरूम्स, कौशल्य विकास केंद्र, करीअर गाईडंस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , स्टार्टअप इन्क्युबेशन सपोर्ट, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण , उद्योग-शिक्षण  भागीदारी, विद्यार्थ्यांनी देश व राज्य पाटलीवर मिळविलेले विशेष प्राविण्य , अशा  अनेक बाबींचा समावेश  आहे.
सुमित कोल्हे यांना मिळालेल्या पुरस्काराबध्दल त्यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!