banner ads

जिल्हा विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत खाडे , कार्याध्यक्षपदी दादासाहेब शेळके , उपाध्यक्षपदी प्रशांत तोरवणे

kopargaonsamachar
0

 

जिल्हा विस्तार अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत खाडे , कार्याध्यक्षपदी दादासाहेब शेळके , उपाध्यक्षपदी प्रशांत तोरवणे


कोपरगाव समाचार :--
अहिल्यानगर जिल्हा विस्तार अधिकारी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड अहिल्यानगर येथे करण्यात आली संघटनेच्या नुतन अध्यक्षपदी चंद्रकांत खाडे , कार्याध्यक्षपदी दादासाहेब शेळके , उत्तर विभागाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत तोरवणे यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना अहील्यानगर नवनिर्वाचित कार्यकारीणीचे गठन अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेमध्ये अहिल्यानगर विस्तार अधिकारी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली नवीन कार्यकारणीमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून चंद्रकांत खाडे विस्तार अधिकारी पंचायत समिती अहिल्यानगर, कार्याध्यक्षपदी दादासाहेब शेळके विस्तार अधिकारी पंचायत समिती शेवगाव,तर उत्तर विभागाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत तोरवणे विस्तार अधिकारी पंचायत समिती कोपरगाव.दक्षिण विभागाच्या उपाध्यक्षपदी .संजय जगताप विस्तार अधिकारी पंचायत समिती पारनेर.महिला आघाडी प्रमुख श्रीमती सुवर्णा लेंडे पंचायत समिती नेवासा .जिल्हा संघटक म्हणून श्री. परमेश्वर सुद्रिक विस्तार अधिकारी पंचायत समिती कर्जत संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री राजा अटकोरे विस्तार अधिकारी पंचायत समिती अकोले तर विस्तार अधिकारी संघटनेच्या सचिव पदी श्री संजय गिऱ्हे विस्तार अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली





 यावेळी नूतन कार्यकारणी अभिनंदन व सत्कार करण्यात आले यावेळी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा प) दादाभाऊ गुंजाळ  यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच राज्य संघटनेच्या वतीने देखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.करण्यात आले

यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष  चंद्रकांत खाडे यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद भंडारी यांच्या आदेशानुसार तसेच माननीय  दादाभाऊ गुंजाळ  व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!