banner ads

कोपरगावकरांनो एकदा स्मार्ट सिटीच्या जागेचे उतारे तपासा

kopargaonsamachar
0

 

कोपरगावकरांनो एकदा स्मार्ट सिटीच्या जागेचे उतारे तपासा


कोपरगाव समाचार :- जोपर्यंत कोपरगावकर पाण्यासाठी वणवण करतील तोपर्यंत आपल्या राजकीय साम्राज्याला धक्काच लागू शकत नाही ह्या गैरसमजातून विरोधकांनी २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची सभा घेवून कोपरगावकरांना पाणी देणार असल्याचे वदवून घेतले होते. मात्र स्वत: आमदार, राज्यात व केंद्रात त्यांचेच सरकार असतांनाही कोपरगावकरांना ते पाणी देवू शकले नाही हि वस्तुस्थिती आहे. मात्र चांगले झाले तर आम्ही केले आणि चुकीचे झाले तर आ.आशुतोष काळे यांच्यामुळे झाले हा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडून सुरु होता आणि राहणार आहे. त्याचीच पुनरावृत्ती करतांना पुन्हा स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर नेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी कोपरगाव तालुक्याच्या बाहेर ज्या ठिकाणी संभाव्य स्मार्ट सिटी होणार आहे त्या स्मार्ट सिटीच्या जागेचे उतारे कोपरगावकरांनी एकदा तपासून पहावे. त्या जागेच्या उताऱ्यावरची विवेक कोल्हे आणि पराग संधान यांची नावे पाहून कोपरगावकरच सांगतील स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर कोणी नेली असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगत कोल्हेंच्या शिडातील हवाच काढून टाकली आहे.



कोपरगाव शहरात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याच्या महसूलमंत्र्यांच्या सभेत विवेक कोल्हे यांनी स्मार्ट सिटी कोपरगाव तालुक्याच्या बाहेर नेल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाची शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी कोपरगाव शहरातील कॉर्नर सभेत चांगलीच पिसे काढली. ते म्हणाले की, निवडणुका आल्यावरच विरोधकांना विकास आठवतो.त्यामुळे आपल्या नेत्यांच्या सभा घ्यायच्या आणि लोकांना वेड्यात काढायचे काम विरोधकांनी आजवर केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा कोपरगावकरांना आली असून महसूल मंत्र्यांच्या सभेत असणाऱ्या नागरीकांना उतारे देणार असल्याचे महसूल मंत्र्यांकडून वदवून घेतले असले तरी ज्याप्रमाणे निळवंडेच्या पाण्याबाबत झाले तेच उताऱ्याच्या बाबतीतपण होणार आहे हे कोपरगावकरांना चांगलेच माहित आहे.परंतु याच सभेत विरोधकांकडून स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर नेल्याचा हास्यास्पद व बिनबुडाचा आरोप करण्यात आला.



परंतु ज्यावेळी स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर गेली त्यावेळी आमदार तर सौ.स्नेहलता कोल्हे होत्या व सरकारही त्यांचेच होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची सत्ता त्यावेळी आ.आशुतोष काळे यांच्याकडे नसतांना स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर ते कशी घेवून जावू शकतात? त्यामुळे विरोधकांचे आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत. मात्र स्वत:चा स्वार्थ साधायचा आणि पाप दुसऱ्यावर लोटून द्यायचे हे विरोधकांचे कारनामे पण जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी संभाव्य स्मार्ट सिटी होणार आहे त्याठिकाणच्या जागेचे उतारे कोणाच्या नावचे आहे हे पण पाहणे गरजेचे असून विरोधक किती खोटे बोलत आहे आणि जनतेची दिशाभूल करीत आहे हे उताऱ्यावरचे विवेक कोल्हे आणि पराग संधान यांची नावे पाहून कोपरगावकरांना आल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे अशा संधी साधू आणि विकासाला विरोध करणाऱ्या विरोधकांना कोपरगावचे सुज्ञ मतदार पुन्हा एकदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे सुनिल गंगुले यांनी यावेळी सांगितले.
               

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!