banner ads

मतदार सावध, नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकाच पक्षाचे - विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 

मतदार सावध, नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकाच पक्षाचे - विवेक कोल्हे 


कोपरगाव समाचार :- कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून वीस तारखेला होणाऱ्या मतदानात मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचे नगरसेवक विजय होत आहेत. गत वेळी नगरसेवक निवडून आले मात्र नगराध्यक्ष वेगळा असल्याने नागरिकांना अपेक्षित कामे पूर्ण करून मिळाली नाही यावेळी मात्र मतदारांनी कोल्हे गटाचे बहुसंख्य नगरसेवक निवडून देण्याचा निर्धार केलेला असून नगराध्यक्ष देखील उच्चांकी मताधिक्याने भाजपा मित्र पक्षांचे पराग संधान हे विजयी होणार असल्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक 2,7,14 येथील प्रचार सभा दरम्यान मनोगत व्यक्त केले.



मोठ्या प्रमाणावर सर्वच घटकांनी आमच्यावर विश्वास दाखवला असून अफाट जनसमुदाय विकासाच्या मुद्द्यावर आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. विरोधकांकडे संपूर्ण निवडणुकीत प्रचारादरम्यान दाखवण्यासारखं सांगण्यासारखं काहीही नसल्याने लोणचे पापड यावरती त्यांना निवडणूक न्यावी लागली. आम्ही विश्वासनामा सादर करून तो पूर्ण करण्यास देखील सुरुवात केली आहे त्यामुळे प्रत्यक्ष घडणाऱ्या कृतीने महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांसोबत उघडपणाने प्रचारात सक्रिय झाला आहे. 
अल्पसंख्यांक समाजाला कधीही कोल्हे कुटुंबाने दुरावा दिलेला नसून भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेकडो योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केले जाते. कुठेही दूजाभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं प्रामाणिक समाजकारण स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून आम्ही करतो आहोत. शहरातील विविध भागातील नागरिकांना शासकीय जमिनीवरील त्यांची घरे आणि जागा नियमाकुल करून मिळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला निर्णय कोपरगावकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणारा असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.



अतिशय सकारात्मक प्रतिसाद प्रचारदरम्यान आम्हाला मिळाला असून सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष अतिशय मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहेत यात कुठलीही शंका आता उरली नाही. प्रलोभनाला बळी पडून नागरिक विरोधकांच्या भूलथापांना भीक घालणार नसल्याने वीस तारखेला मतदान संपल्यानंतर प्रत्येक घरामध्ये एकच चर्चा सुरू असेल सगळीकडे कमळाला आणि मित्र पक्षांना प्रचंड मतदान झालं.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!