ब्राम्हणगावच्या सरपंचांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पंचकोंशीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडुंन शुभेच्छा.
कोपरगाव समाचार :
ब्राम्हणगावचे भूमिपुत्र शांत, संयमी मनमिळाऊ त्यांनी गेले तीन-चार वर्षापासून गावचा सरपंच या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या कार्य काळामध्ये गावचा कायापालट होऊन चांगला विकास झाला. त्यांनी आपल्या ग्रामपंचायत मधील सहकारी, ग्रामस्थ यांना बरोबर घेत गावांमध्ये विविध लोकाभिमुख योजना राबवत अनेक कामांना गती देत निधी उपलब्ध करुन गावाची वेगळी ओळख निर्माण केली असे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले पाटील यांचा वाढदिवस ग्रामस्थांनी विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला .
.ब्राह्मणगाव येथील परमपूज्य श्री बालयोगी महाराज आश्रम येथील गोशाळा येथे सर्व मित्र परिवार तसेच ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीत जनावरांना चारा देण्यात आला तसेच ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले शाळेतील २० गरजू विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची स्कूल बॅग देऊन हा वाढदिवस साजरा झाला .विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू व समाधान पाहून हीच वाढदिवसाची भेट असल्याचे अनुराग येवले यांनी सांगितले .






