banner ads

समाजाचे कार्य पुढे नेत असताना, एकीचे बळ महत्त्वाचे - ज्योतिषाचार्य प्रभाकरआप्पा भोजने.

kopargaonsamachar
0

 समाजाचे कार्य पुढे नेत असताना, एकीचे बळ महत्त्वाचे -  ज्योतिषाचार्य प्रभाकरआप्पा भोजने.

कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे 
 महानुभाव भोपे पुजारी समाजाचे कार्य पुढे नेत असताना त्यासाठी एकीचे बळ महत्त्वाचे आहे. समाजात अनेक अडचणी आहेत.मठ मंदिरांचे प्रश्न व त्यांच्या अडीअडचणी अनेक वर्षांपासून आजही प्रलंबित आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी महत्त्वाची आहे. समाज कसा एकत्र आला पाहिजे ते इतर समाजाकडून शिकले पाहिजे, समाज एकत्र येऊन त्यासाठी काही तरी केले पाहिजे अशी भावना प्रत्येकाने ठेवत काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रभाकरआप्पा भोजने यांनी केले आहे.

कोपरगाव शहरातील नामदेवराव परजने पाटील लॉ कॉलेज येथे आयोजित अखिल विश्व महानुभाव भोपे, पुजारी समाज संघटनेच्या स्थापणेसाठी चौथी बैठक नुकतीच पार पडली यावेळी ते बोलत होते.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षास्थानी श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथील दत्त मंदिराचे पुजारी व पोलीस पाटील मदनराव कोठी हे होते.बैठकीचे आयोजक डॉ.हिरालाल महानुभाव यांनी केले .यावेळी श्री क्षेत्र जाळीचा देव येथील पुजारी सुधाकर उदरभरे, कामगार नेते अरुण भोजणे, डॉ. निखिल महानुभाव, अरविंद मराठे, बाप्पा कपाटे, केशव कारंजकर, 
राजू कोठी, राजू उदरभरे,,श्रीकांत अमृते, गोविंद पुजारी,
ज्योती रोहकले मुंबई,कविता मठपती छ. संभाजी नगर,
राजेंद्र कवीश्वर धुळे, डॉ. दगडू भोजने धुळे आदिसह 17 जिल्ह्यातील विविध महानुभाव महास्थानांचे पुजारी हजर होते.
प्रारंभी ईश्वर भक्त गंगाधर साळुंके नगर, गोपीनाथ अमृते नाशिक, विशाल बाबा कपाटे छ. संभाजी नगर या संताच्या हस्ते धर्म ध्वजचे पूजन करण्यात आले. तर स्वागत गीत वेदराज कपाटे शिरापूर यांनी सादर केले.

विविध जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी आपले विचार संघटने बद्दल मांडले. या बैठकी विविध ठरावावर चर्चा करण्यात आली व त्यांना सर्वांनी मान्यता दिली.यावेळी प्रभाकरअप्पा भोजने यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा जाळीच्या देव येथे होणाऱ्या पाचव्या महानुभाव भोपे पुजारी संघटनेच्या मेळाव्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तर समाजातील विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच अमृत मोहत्सवी वाढदिवसाबद्दल रोहिणी तालुका चाळीसगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते केशव सखाहारी भोजने व सौं सुमनताई केशवराव भोजने यांना समाजातर्फे मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन 
जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुढे बोलतांना प्रभाकर भोजने म्हणाले की,
आपल्या समाजाकडे आज देवपूजा सोडून काहीही नाही त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री कारंजेकर बाबांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत. संघटनेबद्दल समाजात कोणाचाही गैरसमज होऊ नये. चांगल्या व विकास कामांना खोडा घालू नये यासाठी समाज बांधवानी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणीही समाजाला खोटी आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल करू नये. समाजासाठी अनेकांची तळमळ आहे.  आपण मठ मंदिर बचाव मोहीम सुरू करणे गरजेचे आहे. महानुभाव समाज व पंथासाठी काम करणारे अनेक महत्त्वाची लोक आहे.समाजातील प्रश्नांबाबत सर्वांनी एकत्र येऊन प्रश्न मार्गी लावावे.महानुभाव समाजासाठी पाहिजे त्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सध्या महानुभाव पंथाचे तीन आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील श्री. चक्रधर स्वामींवर श्रद्धा असणारे आहेत.आगामी काळात पुजारी समाजाचा आमदार करण्याचा देखील आपला मानस असल्याचे प्रभाकर भोजने शेवटी म्हणाले.
डॉ. हिरालाल महानुभाव म्हणाले की,महानुभाव भोपे पुजारी समाज हा खूप कमी प्रमाणात असून स्वामींना मानणाऱ्या प्रत्येकाने समाज हितासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजात अनेक अडी-अडचणी आहेत मात्र अडीअडचणीवर मात करत समाज बांधवांसाठी कार्य करत राहणे गरजेचे आहे.स्वामींनी सर्वात अगोदर त्यांच्याजवळ जाण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. त्यामुळे पुजारी समाजातील कोणीही गर्व व अभिमान न बाळगता स्वामींनी दिलेल्या उपदेश आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे.आपण समाजाला कुटुंब मानून समाजाची काळजी घेत राहिलो तर आपले सर्वांचे प्रश्न लवकर मार्गी लागतील. समाजात अनेक लोक उच्च पदावर आहेत मात्र त्यांनी समाजासाठी काहीही केलेले नाही. त्यांची जर स्वामींवर श्रद्धा असेल तर त्यांनी एकत्र येत काम केले तर समाज पुढे जाईल, मात्र काहींचा स्वभाव हा स्वतः काहीही करायचे नाही व इतरांना तत्वज्ञान शिवकवायचे असे असल्यामुळे अडचणी निर्माण होतं आहे.कोणतेही देव कार्य करण्यासाठी पैसे लागत नाही. त्यासाठी इच्छा शक्ती लागत असते.मी समाजाच्या प्रेमापोटी व श्रद्धेपोटी हे समाज कार्य करत आहे. आपण प्रत्येक जण समाजाच्या पाठीशी उभे राहिलात तर समाज पुढे जाऊन प्रगती करेल.त्यासाठी प्रत्येकाने शिकुण,संघटित होतं स्वतःसह समाजाचा उत्कर्ष करणे गरजेचे आहे.आपला समाज अल्पसंख्यांक समाज असल्यामुळे आपल्यालाच स्वतःच्या उत्कर्षासाठी काम करावे लागणार असल्याचा मौलिक सल्लाही डॉ. हिरालाल महानुभव यांनी दिला आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. क्षेत्र दत्ताजी शिंगवें येथील पुजारी प्रा.कृष्णराज शेवलीकर यांनी तर आभार डॉ. निखिल हिरालाल महानुभाव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!