banner ads

उमेदवार जाहीर करण्यात कोल्हे गटाने घेतली आघाडी;

kopargaonsamachar
0

 उमेदवार जाहीर करण्यात कोल्हे गटाने घेतली आघाडी


नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी उमेदवार जाहीर
पराग संधान यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा

कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे 
 कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह 21 नगरसेवक जागांसाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालयात पार पडला. या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभास मा. आ.स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे तसेच कोल्हे गटाचे पार्लमेंटरी बोर्ड उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यासह विविध प्रभागांमध्ये एकूण 21 उमेदवार जाहीर करण्यात आले असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक आणि जनतेशी निगडीत कार्यकर्त्यांची निवड केल्याचे या वेळी कोल्हे गटाकडून सांगण्यात आले.
ज्यांनी कार्यकर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली, अशा सर्व कार्यकर्त्यांचे आभार स्नेहलता कोल्हे यांनी मानले. मन मोठे ठेवणारे कार्यकर्ते हेच कोल्हे गटाची खरी ताकद आहेत. आम्ही सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख पॅनल दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
युवा नेते विवेक कोल्हे यांनी सांगितले की, उर्वरित प्रभागांतील उमेदवारही काही तासांत घोषित होतील. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि भाजप-आरपीआय-मित्रपक्ष लोकसेवा आघाडी कोपरगावचा ऐतिहासिक विजय निश्चित आहे.कोल्हे गटाचा आत्मविश्वास, जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत असून, कोपरगावकरांचा विश्वास या आघाडीच्या उमेदवारांवर दृढ झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.कोल्हे गटाची निवडणुकीत सरशी, उमेदवार जाहीर करत विजयाचा विश्वास केला व्यक्त.

नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान
1दीपा वैभव गिरमे
1 -वैभव सुधाकर आढाव
2 -राहुल उत्तमराव खरात
2- स्वाती दीपक जपे
3- जनार्दन सुधाकर कदम
3 -
4- दीपाली संजय उदावंत
4
5 - वैशाली विजयराव वाजे
5
6- पद्मावती योगेश बागुल
6 - विक्रमादित्य संजय सातभाई
7 - प्रसाद बाळासाहेब आढाव
7- सोनल अमोल अजमेरे
8- मनिषा दत्तात्रय पगारे -
8 - फरदीन अल्ताफ कुरेशी
9 - जितेंद्र चंद्रकांत रणशूर
9- विजया संदीप देवकर
10 - रवींद्र दत्तात्रय कथले
10 - वृषाली गणेश आढाव
11 -
11 -
12
12
13 - स्वप्नील दिलीप मंजुळ
13 - निलोफर फिरोज पठाण
14 -
14 -
15 -  सुरेखा विनोद राक्षे
15 -अनिल विनायक आव्हाड


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!