शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांचा शिवसेना पक्षाचा राजीनामा
झावरेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
शिवसेनेत निष्ठेने काम करणारे माजी जिल्हाप्रमुख, उत्तर नगर जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सह संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने कोपरगाव शहरासह उत्तर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र झावरे हे गेल्या चार दशकनापासून शिवसेनेशी ऐकनिष्ठ राहीलेले होते. कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्याविरुद्ध त्यांनी कोपरगावात शिवसेना वाढवली.नगर शहरा व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठे शिवसेनेचा दबदबा होता तर तो कोपरगाव येथे होता. शिवसेना तळागाळात पर्यंत वाढवण्याचे काम झावरे यांनी केले. मात्र त्यांच्या अश्या राजीनाम्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला आहे.शिवसेनेत बंड झाले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत न राहण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेना दोन गटात विभागली गेली.तेव्हा झावरे यांना अनेक ऑफर असताना देखील त्यांनी त्या नाकारत. कोपरगाव शिवसेनेत बंड होऊ दिले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वरच्या निष्ठा कायम ठेवत पक्षाचे काम करत राहिलेले झावरे यांनी असा अचानक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र झावरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




