banner ads

सोयाबिन हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

kopargaonsamachar
0

 सोयाबिन हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

शेतक-यांना मिळणार प्रति क्विंटल रूपये 5,328/- भाव
कोपरगांव समाचार / लक्ष्मण वावरे 
कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीच्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राला NCCF व पणन विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. सोयाबीन पिकाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. शेतक-यांनी आपल्या शेतमालाला योग्य़ किंमत मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सभापती  साहेबराव  रोहोम व उपसभापती.गोवर्धन परजणे यांनी केले आहे.
             याबाबत सभापती श्री.रोहोम म्हणाले, सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतक-यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा मिळणार आहे. शासनाचा पणन विभाग व NCCF अंतर्गत आधारभुत किंमत खरेदी योजना 2025-26 सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांचा सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी केला जाणार आहे. कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीच्या वतीने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतक-यांनी पुढील आवश्य़क कागदपत्रासह आपली नोंदणी पूर्ण करावी. या खरेदी केंद्रात सोयाबीन ला 5 हजार 328 रूपये प्रति क्विंटल असा हमीभाव मिळणार आहे. नाव नोंदणीसाठी 7/12, 8अ उतारा (ई-पिक पाहणी 25-26), आधारकार्ड झेरॉक्स़, आधार लिंक बँक खाते (सुस्पष्ट़ झेरॉक्स़) व मोबाईल नंबर आवश्य़क आहे. जनधन खाते स्विकारले जाणार नाही. नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सोयाबीन खरेदीसाठी आणण्यासाठी वेळ व तारीख SMS व्दारे कळविण्यात येईल.
                 नवीन नियमाप्रमाणे ज्या शेतक-यांच्या नावाने चालू वर्षी 2025-26 ला उता-यावर सोयाबीनची नोंद आहे.  त्या शेतक-यांनीच नोंदणी केंद्रावर येणे अनिवार्य आहे. नोंदणी केंद्रावर दुसरा इतर कोणतीही व्यक्ती त्या शेतक-यांची नोंद करू शकणार नाही. ज्या शेतक-यांच्या नावावर सोयाबीन आहे. त्याच व्यक्तीने सोयाबीनची नोंद करणे सक्तीचे केले असून नोंद करतांना सदर व्यक्ती उपस्थित असणे गरजेचे आहे. नोंदणी कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीच्या मुख्य़ कार्यालयात करावयाची आहे.                           
                सर्व सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी वेळेत नोंदणी करून या शासकिय योजनेचा लाभ घ्यावा व खाजगी व्यापा-यांना कमी भावात सोयाबीन विक्री करू नये, असे आवाहन सचिव .नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!