कर्जफेडीपोटी दिलेला चेक न वटविल्याने जामिनदारास शिक्षा
कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे
कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगांव यांचे शिर्डी शाखेतुन सुनिता बापु शिंदे यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी त्यांचे पती व जामिनदार बापु सखाहरी शिंदे यांनी दिलेला १५ लाख रुपयेचा चेक न वटल्याने ज्योती पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रयुमेंट अॅक्ट १३८ अन्वये फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.१५/२०१८ दाखल केला
त्यामध्ये चौकशीअंती आरोपी बापु सखाहरी शिंदे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगांव येथील न्यायाधीश जी. डी. अग्रवाल साहेब यांनी आरोपीस १२ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती पतसंस्थेस ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई व्याजासह ३० दिवसात देण्याचा आदेश केला. नुकसान भरपाईची रक्कम निकाल तारखेपासून ३० दिवसात न दिल्यास अधिक ६ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.






