banner ads

चिमुकलीचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गेला प्राण, जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

  चिमुकलीचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गेला प्राण, जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - विवेक कोल्हे


बिबट्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र भूमिका घेऊ

कोपरगाव समाचार  / लक्ष्मण वावरे 
टाकळी चर नजीक एका साडेतीन वर्षीय चिमुकलीचा ५ नोव्हेंबर रोजी बिबट्याने हल्ला केल्यामुळे प्राण गेला आहे.अतिशय दुर्दैवी खेदजनक घटना आहे.रेंजर,राऊंड ऑफिसर,फॉरेस्ट गार्ड यांना धारेवर धरत युवानेते विवेक कोल्हे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणामुळे फैलावर घेतले होते.टाकळी फाटा येथे मृतदेह घेऊन येत नगर मनमाड महामार्ग रोखत नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या निष्काळीपणाचे निदर्शन करत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली त्यावेळी विवेक कोल्हे यांनी भूमिका व्यक्त केली तसेच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अनेकदा कोपरगाव तालुक्यात बिबट्या निदर्शनास येतो. साठ ते सत्तर एवढे बिबटे मुक्त संचार करत आहेत.पिंजरे पुरेसे उपलब्ध नाही.वनविभागाचे अधिकारी जनजागृती कार्यक्रम घेत नाहीत त्यामुळे निष्पाप नागरिक बळी जात आहेत. ऊसतोडणी मजूर आलेले असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी तातडीने प्रशासनाने हालचाल करावी.आपण बिबट्याचा नसबंदीची मागणी केलेली आहे त्यासाठी निर्णय व्हावा अशी मागणी शासनाकडे केली आहे.सध्या शेतकरी अतिशय भितीत असून तातडीने हा प्रश्न मार्गी लागने गरजेचे आहे.

नुकतेच राज्य सरकारने ११ कोटी २५ लक्ष तरतूद बिबट्याच्या बंदोबस्तासाठी केली आहे मात्र ती पुरेशी नाही कारण जवळपास १३०० ते १४०० हून अधिक नगर आणि पुणे या दोनच जिल्ह्यात बिबट्याची संख्या असण्याचा प्राथमिक अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे.लोकप्रतिनिधींनी अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले झाले तिथे साधी नागरिकांना भेटही दिले नाही हे उचित नाही.प्रशासनाने जर पकडलेले बिबटे कुठे सोडावे याचे नियोजन केले किंवा अभयारण्यात सोडण्याची परवानगी घेतली तर अनेक सामाजिक संस्था आणि आम्ही पुढाकार घेऊ व पिंजरे बनवून संख्या वाढवू पण त्यासाठी असणारे नियम बदलावे यावर काम व्हावें.जी चिमुकली निधन पावली आहे तिच्या कुटुंबाला मदत शासनाने करावी आणि तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली आहे.कोल्हे यांच्या या परखड भूमिकेनंतर दुसऱ्या दिवशी तातडीने वनविभाग पथक दाखल होऊन युद्धपातळीवर बिबट्याच्या शोधात लागले आहे.

( तुम्हाला मुरुम वाहतूक करणारे वाहने सोडण्यासाठी तोड पाणी करायला वेळ आहे पण गोर गरीब जनतेसाठी तुम्हाला बिबट्यापासून बचाव कसा व्हावा ही जनजागृती करायला वेळ नाही असा रुद्रावतार विवेक कोल्हे यांनी घेतला त्यावर वन अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे ठोस नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.)
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!