banner ads

टाकळी परीसरातील त्या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा

kopargaonsamachar
0

 टाकळी परीसरातील त्या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा

आ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या कडे मागणी 
कोपरगाव समाचार/ लक्ष्मण वावरे 
कोपरगाव मतदार संघातील टाकळी गावाच्या परीसरात बुधवार (दि.०५) रोजी तर बिबट्याने ऊस तोडणी करणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात या चिमकुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सदरची घटना अत्यंत हृदयद्रावक असून, स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मानवी रक्ताला चटावलेल्या त्या नरभक्षक बिबट्याचा ज्याप्रमाणे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बिबट्याचा बंदोबस्त केला आहे त्याप्रमाणे याही नरभक्षक बिबट्याचा तातडीने बदोबस्त करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार , वनमंत्री ना. गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 

दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की,  राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याचे लोन कोपरगाव मतदार संघातही वाढले आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करणाऱ्या बिबट्याने टाकळी परिसरातील काही नागरीकांवर केलेल्या हल्ल्यात काही नागरीकांनी स्वत:च्या जीवावर उदार होवून बिबट्याचा हल्ला परतावून लावत काही लहान मुले व नागरीक थोडक्यात बचावले होते. परंतु बुधवार (दि.०५) रोजी टाकळी परीसरात बिबट्याने रात्री आठच्या सुमारास टाकळी रोड वरील कोपरे वस्ती देवकर प्लॉट जवळ चरावर राहणाऱ्या ऊस तोडणी कामगाराच्या ४ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सदरची घटना घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
कोपरगाव मतदार संघात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संख्या अतिशय कमी असून त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर वेळेवर मदत उपलब्ध होत नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व नागरीकांवर वाढले हल्ले रोखण्यासाठी कोपरगाव मतदार संघात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची व पिंजऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच मयत चिमुकलीच्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. 

तसेच ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकाला जीव गमवावा लागलेल्या घटनेनंतर ज्या प्रकारच्या उपाय योजना करून त्या परिसरातील बिबटे जेरबंद करण्यात येवून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आला होता  त्याच धर्तीवर कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसराप्रमाणे ज्या ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी पिंजरे बसवून जेरबंद केलेले बिबटे दूरच्या अभयारण्यात सोडण्यात यावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार , वनमंत्री ना. गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.   
                
 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!