काका कोयटें च्या एंट्रीने निवडणुकीत रंगत येणार ?
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करताच कोयटेंना काळे गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारीकोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता उद्योग समूहाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांनी आमदार . आशुतोष काळे यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन कोपरगाव शहराच्या विकासासाठी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार)पक्षात प्रवेश केला.प्रवेश करताच आमदार आशुतोष काळे यांनी काळे गटाचे कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोयटे यांना जाहीर करुन , कोल्हे गटाकडून प्रभाग ३ मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार असलेल्या जनार्दन कदम यांचा काळे गटात प्रवेश करुन घेत कोल्हे गटाला पहीला धक्का दिला.
दोन दिवसांपूर्वी युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगरपालिके च्या नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांची उमेदवारी व नगरसेवक पदाच्या काही प्रभागातील विविध उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली त्यानंतर दोनच दिवसात आमदार आशुतोष काळे यांनीही ओमप्रकाश तथा काका कोयटे यांचा पक्षप्रवेश करून घेत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत आपले पारडे जड करत सर्वांनाच मोठा धक्का दिला तर यावेळी बोलताना काका कोयटे म्हणाले की मी अनेक वर्षापासून राजकारणात आणि समाजकारणात असल्याने माझे कोपरगाव विषयी असलेले प्रेम त्यामुळे मी राजकारणातून बाहेर असलो तरी समता परिवाराच्यावतीने तसेच व्यापारी महासंघाच्या वतीने सर्वांना बरोबर सर्वांसोबत घेऊन शहरात सामाजिक काम करीत राहिलो आज परत आ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश करत असून सर्वांच्या स्वप्नातील कोपरगाव राज्यात एक नंबर करण्यासाठीच उमेदवारी करत असल्याचे सांगत माझ्या पक्षाचे सर्वचे सर्व तीस नगरसेवक घेऊन शहर विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले .
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीचा सामना काळे गट व कोल्हे गटात होत असला तरी या निवडणूकीत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगरसेविका सपना मोरे ,गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे ,शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांची भूमिका महत्त्वाची ठरणार हे मात्र नक्की.








