भाजपा चे पराग संधान उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगाव यांच्या सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज 17 नोव्हेंबर रोजी भरला जाणार आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संधान पराग शिवाजी व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांचे अर्ज दाखल केले जाणार आहे..
यावेळी सकाळी 10 वाजता पदयात्रा निघणार असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे स्मारक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, विघ्नेश्वर मंदिर, दत्त मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व त्यानंतर तहसील मैदान कोपरगाव या ठिकाणी सर्व एकत्रितरित्या जाणार आहेत.




