banner ads

ऊसाच्या बालेकिल्ल्यात केळीची एंट्री ! जिल्हाधिकाऱ्यांकडून केळी बागेची पाहणी

kopargaonsamachar
0

 ऊसाच्या बालेकिल्ल्यात केळीची  एंट्री ! जिल्हाधिकाऱ्यांकडून केळी बागेची पाहणी 

कोपरगाव-- लक्ष्मण वावरे 
साखर कारखान्यांचा तालुका व ऊसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ऊसाची जागा केळी घेत असल्याचे चित्र तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या केळी बागांच्या लागवडी क्षेत्रावरुन दिसते केळीला उत्तम दर मिळत असल्याने शेतकरी ऊस लागवडीऐवजी केळी उत्पादनाकडे वळत आहे.ओगदी येथील युवा शेतकरी राहुल विष्णू कोल्हे यांनी माळरानावर फुलविलेल्या केळी पिकास जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी भेट देत केळीच्या पिकाची गुणवत्ता आणि मनेरेगा अंतर्गत विकसित केलेल्या केळी बागेची पाहणी केली .

जिल्हाधिकारी डॉ.आशिया कोपरगाव दौऱ्यावर असताना मनेरेगा अंतर्गत लागवडी खाली असलेल्या ओगदी येथे राहुल कोल्हे यांच्या केळी बागेची पाहणी करत शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडल कृषी अधिकारी साईनाथ मलीक, कृषी सेविका शुभांगी निवाडे, तलाठी कृष्णा आरसावे, ग्रामसेवक रफिक सय्यद, यांच्यासह 

ओगदी सोसायटीचे चेअरमन रविंद्र पोळ, विष्णूपंत कोल्हे, रामनाथ गोणटे, सदाशिव गोणटे, सुनील बोठे, प्रकाश कोल्हे, अजित बोठे, अतुल बोठे,बाळू कोल्हे, समाधान कोल्हे,आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपारीक पध्दतीने शेतीत नफा होत नसल्याने ओगदी येथिल अल्पभूधारक युवा शेतकरी 
राहुल कोल्हे यांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष केंद्रित करत आपल्या कडील एक हेक्टर क्षेत्रापैकी ६० गुंठे क्षेत्रात शासनाच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केळीच्या बागेची लागवड केली सध्या ही बाग बहरली असुन तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असुन याविषयी जिल्हाधिकारी यांनी या पिकाची लागवड, देखरेख, वेगळेपण, विक्री व्यवस्थापन, बाजारपेठ उपलब्धता, मशागत खर्च, औषध फवारणी, खतपुरवठा, आदींची माहिती घेत पारंपरिक शेती सोबतच युवा शेतकरी राहुल कोल्हे यांनी आधुनिकतेची कास धरत प्रथमच केळी पिकाची लागवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

( शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी लागवडीकडे वळले पाहिजे. त्यासाठी 
शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पाच एकराखालील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख ८७ हजार एवढे अनुदान घोषित केले. त्यामुळे शेतकऱ्यात उत्साह निर्माण झाला असून . शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. आम्ही शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन व सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. कोपरगाव तालुक्यात थोड्याच दिवसात शंभर हेक्टर च्या वर केळी बाग टप्पा पार करणार असुन मोठ्या प्रमाणात केळी बागायतदारांची संख्या वाढत आहे .एका महसूल मंडळात पन्नास एकर क्षेत्रात केळी ची लागवड झाली तर त्यास विमा कवचही असणार आहे.
. - मनोज सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव )



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!