नंदकिशोर टोरपे यांना " युवा संघर्ष योद्धा उद्योजक पुरस्कार" प्रदान
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने देण्यात येणारा युवा संघर्षयोद्धा उद्योजक पुरस्कार मौनगिरी पशु औषधालायाचे संचालक नंदकिशोर टोरपे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा कोपरगाव येथे नुकताच पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल, शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर, शिवसेना माजी शहर प्रमुख भरत मोरे, हनीफ भाई पठाण, भाऊसाहेब आव्हाड, परशुराम साळवे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते हा गौरव पूर्ण पुरस्कार नंदकिशोर टोरपे यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील दूध उत्पादकांची अडचण लक्षात घेऊन दूध उत्पादकांना योग्य भावात देशी विदेशी औषधे उपलब्ध होण्यासाठी नंदकिशोर टोरपे यांनी २०२२ साली मौनगिरी पशु औषधालयाची स्थापना केली कोपरगाव सह येवला, वावी, संगमनेर येथे शाखा सुरू करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना माफक दरात औषधे उपलब्ध करून देत एक प्रकारची गो सेवा करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना "युवा संघर्षयोद्धा उद्योजक पुरस्कार" प्रदान करण्यात आला मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.






