कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोफत मोतीबिंदू शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ दहेगाव बोलका येथे मोठ्या उत्साहात झाला. भारतीय जनता पार्टी, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ व मनिषंकर आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाचा शुभारंभ मा. आ.स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी शिबिरात प्रत्यक्ष भेट देत रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे राज्याने विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली असून त्यांच्या प्रेरणेनेच हे उपक्रम कोपरगावात शक्य होत आहेत. प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. सेवा हाच धर्म या भावनेने नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असणारा जनसेवेचा आलेख कोल्हे कुटुंब उंचावत आहे.
या शिबिरामध्ये अनुभवी नेत्रतज्ज्ञांच्या टीममार्फत मोतीबिंदूची तपासणी करण्यात आली आणि आवश्यक रुग्णांची शस्त्रक्रिया नाशिक येथे मोफत करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पुढील शिबिर २३ जुलै: बाजारतळ, रवंदे,२४ जुलै: हनुमान मंदिर, रांजणगाव देशमुख,२५ जुलै: साईमंदिर परिसर, वाकडी
वेळ: सकाळी १० ते दुपारी २ असणार आहे.
या सामाजिक उपक्रमामागे मा. आ. स्नेहलता कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभत असून, या उपक्रमामुळे कोपरगावातील आरोग्यविषयक जनजागृतीस चालना मिळाली आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिबिरासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





