banner ads

कर्जफेडीसाठी खोटा चेक दिल्याप्रकरणी जामिनदारास दंड आणि करावासाची शिक्षा

kopargaonsamachar
0

 कर्जफेडीसाठी खोटा चेक दिल्याप्रकरणी जामिनदारास दंड आणि करावासाची शिक्षा


कोपरगाव / लक्ष्मण वावरे
 कर्जदाराच्या कर्जफेडीसाठी खोटा चेक देऊन पतसंस्थेची फसवणूक केल्या प्रकरणी जामिनदारास कोपरगाव न्यायालयाने दंड आणि करावासाची शिक्षा सुनवली आहे. न्यायालयाच्या यानिकालाने हेतुपुरस्पर बँका -पतसंस्थांचे कर्ज थकविणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की  कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून
 बाबुराव एकनाथ नरोडे यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी त्यांचे जामीनदार सुरेश बाबुराव नरोडे यांनी दिलेला रु.८ लाखाचा चेक न वटल्याने ज्योती पतसंस्थेने त्यांचेवर  रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस. सी. सी. नं. १९८/२०१७ दाखल केला
होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी सुरेश बाबुराव नरोडे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने  कोपरगांव येथील न्यायाधीश . जी. डी. अग्रवाल यांनी आरोपीस १२ महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
तसेच फिर्यादी ज्योती पतसंस्थेस रु. १५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम निकाल तारखेपासून ३० दिवसात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याचे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याकामी अँडव्होकेट एस्. डी.
काटकर यांनी कामकाज पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!