banner ads

संतांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव -- डॉ एकनाथ पगार

kopargaonsamachar
0

 संतांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव -- डॉ एकनाथ पगार

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे  )

श्री संत ज्ञानेश्वर माऊली, श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेवराय, संत बहिणाबाई, संत गाडगे महाराज आदी संतांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव असून मराठी भाषा अभिजात भाषा आहे. संत साहित्य समाजापुढे आदर्श निर्माण करण्याच्यादृष्टीने डॉ. तानाजी राऊ पाटील गौरव ग्रंथाची निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ एकनाथ पगार यांनी केले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कोपरगाव आयोजित व प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, प्रा. डॉ. संदीप सांगळे संपादित डॉ. तानाजी राऊ पाटील गौरव ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच येथील नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज येथे करण्यात आले यावेळी डॉ. पगार बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद कोपरगाव शाखेचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव होते.
डॉ.तानाजी राऊ पाटील म्हणाले की, मी माझा काळ या गौरव ग्रंथाच्या माध्यमातून मागे घेऊन चाललो आहे.एकांतात बसून आपण काही तरी लिहिलं पाहिजे असं वाटू लागल्यामुळे तसेच आई-वडिलांनी व पत्नीने साथ दिल्याने आजवर 16 पुस्तकं व 15 पुरस्कार मिळाले असून ही माझ्या जीवनातील मोठी उपलब्धी आहे. मला परिस्थितीने अडवलं मात्र थांबायचं नाही ही खूण गाठ मनाशी बाळगल्यामुळे कुठंही थांबलो नाही.त्यामुळे या गौरव ग्रंथाची निर्मिती झाली आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ.हिरालाल महानुभव म्हणाले की, संत साहित्यासह डॉ. तानाजी राऊ पाटील यांच्या जीवनावर आधारित गौरव ग्रंथ सोहळ्यांमधून  डॉ. तानाजी राऊ पाटील यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे.त्यांचे मराठी साहित्यातील योगदानाची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली जावी. तसेच अशा कार्यक्रमांमुळे समाजात प्रेरणा निर्माण होते असते त्यामुळे सांस्कृतिक वारसा जपला जातो असेही शेवटी महानुभाव म्हणाले.
डॉ.दिलीप धोंडगे म्हणाले की, डॉ. तानाजी राऊ पाटील गौरव ग्रंथ यात चाळीस लेख संत साहित्यातून घेतलेले आहे तर डॉ. पाटील यांच्या जीवनातील प्रसंगाचे कथन या ग्रंथात आहे.संत तुकाराम महाराज हा संत साहित्याचा त्यांचा विषय असल्यामुळे संत पाहावयासी गेले आणि संतच होऊन गेले असे डॉ. तानाजी राऊ पाटील आहेत.
यावेळी डॉ एकनाथ पगार, प्रा. दिलीप धोंडगे ,डॉ.हिरालाल महानुभाव, डॉ. शिरीष लांडगे,एम जी चिखलीकर, मोहिनी कारंडे, नानासाहेब जमादार,डॉ. संदीप सांगळे, प्राचार्य भाऊसाहेब गमे,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, माजी नगरसेवक अजय गर्जे,अशोक येरुडकर,निर्मला कुलकर्णी, डॉ.भाऊसाहेब गमे,डॉ. सुमित्रा अत्रे, डॉ.पांडुरंग मिसाळ, संदीप खाडे,नीलिमा कुलकर्णी,नरेश हळनोर,निलेश लंगोटे,रंजना घोलप,रोहित वाघ, संताजी पाटील,शारदा पाटील, नेताजी पाटील,सुधाकर पाटील,संदीप यादव,साधना यादव,शिवाजी सूर्यवंशी,महेश पाटील,प्रियंका पाटील,श्लोक यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दिलीप धोंडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुधाकर पाटील यांनी मानले व पसायदानाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!