प्रत्येकांने कुलस्वामीनीची उपासना करावी-प. पू. प्रसाद महाराज अंमळनेरकर
प्रत्येक घराण्यांत कुलस्वामीनी असते, काही घरात तिची मोठया प्रमाणांत उपासना केली जाते तेंव्हा कुलस्वामीनी त्या भक्ताकडे स्वतः येते, तेंव्हा प्रत्येकाने कुलस्वामीनीची उपासना करावी असे प्रतिपादन संतश्रेष्ठ सखाराम महाराज अंमळनेरकर संस्थानचे पीठाधिश प. पू. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनी केले.
तालुक्यातील संवत्सर येथील कुलकर्णी वंशजांच्या तुळजाभवानी माता महात्म ग्रंथाचे सोलापुर संत साहित्याचे अभ्यासक नारायण काका कुलकर्णी यांनी लेखन केले असुन त्याचे वरद प्रकाशनच्या वतीने नुकतेच प्रकाशन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येकांने कुलस्वामीनीची सेवा करतांना सर्व मंगल मांगल्य किंवा नवार्ण मंत्राचा जप करावा, कुळधर्म कुलाचार हा वर्षानुवर्षे आपल्या पुर्वजांनी लावून दिला आहे., त्यात अनावधानांने खंड होतो त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागल्यावर मनुष्याला जाग येते तेंव्हा संस्कार अध्यात्माला सध्याच्या युगात महत्व प्राप्त झाले असुन तरूणाईने ते आत्मसात करून पुढे जावे,
प्रारंभी वरद प्रकाशनच्या संचालिका सौ. नुतन राजेश कुलकर्णी यांनी प्रास्तविकासह लेखकाचा परिचय करून दिला. चंद्रकांत संवत्सरकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. उल्हास रत्नपारखी, राष्ट्रीय सेविका समिती व महिला पुरोहित विभागाच्या प्रमुख वैशाली पाठक, दिलीप कुलकर्णी यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. लेखक नारायण काका कुलकर्णी यांनी संत साहित्याचा चिकीत्सक अभ्यास करून विविध ग्रंथांचे लेखन केले असुन त्यांचा प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यांत आला. संवत्सरचे अभियंते राजेश यशवंत कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले.



.jpg)




