banner ads

राज्यपातळीवर महती असलेल्या गोदाकाठ महोत्सवास १० जानेवारी पासून प्रारंभ

kopargaonsamachar
0

 राज्यपातळीवर महती असलेल्या गोदाकाठ महोत्सवास १० जानेवारी पासून प्रारंभ 



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व महिला बचत गटांसाठी आर्थिक पर्वणी असलेला ‘गोदाकाठ महोत्सव’ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.१०) जानेवारी पासून मोठ्या उत्साहात सुरु होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली आहे. 

      
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व पदार्थांची नागरिकांना स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी, खाद्य पदार्थाची रेलचेल व सोबतीला मनोरंजन आणि महिला बचत गटांना आर्थिक उत्पनाचे हक्काचे स्त्रोत निर्माण करून देणारा गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटांसाठी नेहमीच मोठी पर्वणी ठरत आला आहे. सालाबादप्रमाणे याहीवर्षी शुक्रवार (दि.१०) ते सोमवार (दि.१३) पर्यंत एकूण चार दिवस ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे.


महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देवून बचत गटांच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाकडून सातत्याने नवनवीन उपक्रम राबवीले जात आहेत. अशा अनेक उपक्रमांबरोबरच बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी व बचत गटाच्या महिला आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हाव्यात यासाठी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या  गोदाकाठ महोत्सवाची महती राज्यपातळीवर पोहोचली आहे.


 बचत गटाच्या महिलांची ‘हक्काची बाजारपेठ’ अशी वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यात ‘गोदाकाठ महोत्सवाने’ निर्माण केली आहे. या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार (दि.१०) रोजी दुपारी ४.०० वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी व बचत गटांच्या प्रतिनिधींनी भेट देवून अस्सल ग्रामीण संस्कृतीचा व गोदाकाठ महोत्सवाच्या विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेवून बचत गटाने तयार केलेल्या उच्च दर्जाच्या मालाच्या स्वस्त दरात खरेदी करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैताली काळे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!