मैदानी खेळाने खिलाडूवृत्तीला वाव मिळतो -उपसरपंच ऋषिकेश कदम
विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती जोपासून खेळाचा आनंद घ्यावा . खेळामुळे मन सुदृढ होत असते, खेळ भावना विद्यार्थ्यांमध्ये जिद्य व आत्मविश्वास निर्माण करते मुलांना मैदानी खेळाचा विसर पडत चाललाय अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे मुलांमधील खिलाडूवृत्तीला वाव मिळतो आणि मुले भविष्यात चांगले खेळाडू होऊ शकतात असे प्रतिपादन रवंदे ग्रामपंचायतचे उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उदघाटन रवंदे गावाचे सरपंच श्रीमती शोभा भवर , उपसरपंच ऋषिकेश कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपसरपंच ऋषिकेश कदम बोलत होते . 








