banner ads

बक्तरपुर सोसायटीच्या चेअरमन पदी बोडखे तर व्हा. चेअरमनपदी सानप यांची निवड

kopargaonsamachar
0

 बक्तरपुर सोसायटीच्या चेअरमन पदी बोडखे तर व्हा. चेअरमनपदी सानप यांची  निवड 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

बक्तरपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी काशिनाथ शिवराम बोडखे यांच्या नावाची सूचना साहेबराव सानप यांनी मांडली तर संदीप अरुण उगले यांनी अनुमोदन दिले तसेच उपाध्यक्ष पदासाठी संदीप चंद्रभान सानप यांच्या नावाची सूचना बाळासाहेब सानप यांनी दिली त्यास सौ.रेखाताई सोमनाथ सानप यांनी अनुमोदन दिले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे आर एन रहाणे होते.


याप्रसंगी संचालक अशोक मोतीराम सानप,श्रीमती अलकाबाई बोडखे,सौ.अलकाबाई सानप,संदीप सानप,साहेबराव सानप, संदीप उगले,बाळासाहेब सानप,रेखाताई सानप तसेच साई समृद्धी बँकेचे संचालक कृष्णराव सानप बक्तरपुर गावचे माजी लोकनियुक्त सरपंच संजय बोडखे,अरुण उगले,माधवराव बोडखे,कृष्णराव सानप,साहेबराव सानप, दिनेश सानप,सुखदेव सानप,बच्छाव शंकर,सानप संतोष व सुभाष गरुड,सुभाष सानप, संजय सानप,साहेबराव बोडखे, रमेश सानप, विजय सानप, रमेश बोडखे, राजेंद्र लहाने, सानप अर्जुन, शिवराम बोडखे, रामदास पवार आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष काशिनाथ बोडखे म्हणाले की माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनी सहकारी संस्था स्थापन करून त्याला पाठबळ देण्याचे काम केले. त्यांचा वारसा माननीय बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे व  युवानेते विवेक कोल्हे यांनी वारसा पुढे नेण्याचे काम केले आहे. बक्तरपुर सोसायटीच्या सर्व सभासद शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विवेक कोल्हे  यांच्या माध्यमातून शासकीय निमशासकीय योजनांसाठी काम करू आणि सभासद शेतकरी यांना चांगली सेवा देण्याचे काम करू असे म्हणाले.


यावेळी सेक्रेटरी आर एम गुजर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

[ ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असणाऱ्या कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळतो.या सेवा सोसायटी बळकट झाल्या पाहिजे यासाठी कोल्हे कुटुंबाने कोपरगाव मतदारसंघात विशेष कार्य केले आहे.नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.]




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!