banner ads

माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा डाॕ.अशोक गाविञे यांचे अभियान

kopargaonsamachar
0

  .

माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा डाॕ.अशोक गाविञे यांचे अभियान

     डॉ सी ऐम मेहता कन्या विद्यामंदिर          कोपरगाव 

 कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

   डॉ सी ऐम मेहता कन्या विद्यामंदिर  येथे  माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा अभियानाची सुरुवात करण्यात आली असून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या बालविवाह मुक्त भारत याचाच भाग म्हणून डॉ अशोक गावित्रे यांनी माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा अभियान सुरू केले  .


याप्रसंगी प्राचार्या प्रमोदिनी शेलार, पर्यवेक्षक सतीश सोनवणे मेहबूब शेख ,संजय गावित्रे , लि नेन क्लब च्या अंजली थोरे, सोनाली गिरमे,किरण डागा, गायत्री कुलकर्णी आदी उपस्थित होते
सूत्र संचालन नितिन निकम,प्रवीण नीलकंठ यांनी तर आभार  चोपडा  यांनी मानले. 
डॉ अशोक गावित्रे यांनी मुलांना बालविवाह संबंधित कायदेशीर माहिती देत   विद्यार्थी  व शिक्षकांकडुन बालविवाह संबंधि प्रतिज्ञा  घेतली .बालविवाह बेकायदेशीर तरीही अनेक पालक आपल्या मुला मुलीचे बालविवाह करू पाहत आहे
.

या संदर्भात कायदा असुन देखिल असे प्रकार सुरुच आहेत.बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम ९ व १०नुसार बालविवाह लावणाऱ्यास दोन वर्षा पर्यंत कठोर कैद व एक लाख रुपये दंड निश्चित केला आहे ,  .ग्रामीण भागात ग्रामसेवक, पोलिस पाटिल,शिक्षक, आंगणवाड़ी सेविका इ नी पुढे येवून जनजागृति केल्यास असे विवाह थाबवले जावू शकतात .
बालविवाह प्रतिबंध कायदा हा मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे ,या कायद्याप्रमाणे १८वर्षों खालील मुलगी व २१ वर्षोंहुन कमी वयाचा मुलगा कायदेशिर विवाहासाठी योग्य नाही, वर किवा वधु यांच्यापैकी एक जरी अल्पवयींन असेल तर तो बालविवाह ठरतो ,असा विवाह करणारा व्यक्ति ,लग्न ठरवनारे,लग्न पार पाडतांना हजर असणारे सर्व व्यक्ति ,वाजंत्री वाले, ब्राम्हण, मंडपवाले ,हॉल देणारे तसेच मुला मुलीचे आई वडील सर्व कायद्यानुसार गुन्हेगार  ठरतात 



,तसेच  ज्या बालक किवा बालिकेचा विवाह झ!ला असेल परंतु त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करुन रददबाबत ठरवता येतो ,लग्न!च्या वेळी मुलगा किवा मुलगी त्यावेळी दबावामुले विरोध करता आला नसेल अशावेळी सदज्ञान झ!ल्यावर दोन वर्षात त्याना अर्ज करता येतो व बालबद्युला पती किवा पती अज्ञान असल्यास सासऱ्या कडून पोटगी मिळू शकते ,निवारा ख़र्च तसेच अपत्य असल्यास बाळाचे हित पाहुंन न्यायालय बाळाचा ताबा व पोटगीचा आदेश करू शकते ,बालवधु बरोबर लैंगिक संबंध झ!ले असल्यास पास्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल होवू शकतो,हा कायदा सर्व धर्मना लागू आहे,बालविवाहाची माहिती १०९८ या क्रमांक वर चाइल्ड हेल्पलाइन वर कळवल्यास त्यांची माहिती गुप्त ठेवली जाते . बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून महिला बालविकास चे अधिकारी ,ग्रामसेवक ,तसेच अंगणवाडी  सेविका इ नेमणुक केली आहे तसेच बालसरक्षण अधिकारी देखिल यात हस्तक्षेप करुन बालविवाहच थं!बवू शकतात 


व पोलिसाना बोलावणे ,बालकल्याण समिती समोर साजर करने ,बालिकेची विचारपूस करने, गृहभेट अहवाल सादर करने इ कामे ही या अधिकारांची असतात ,त्यासाठी नव्याने प्रशिक्षण आवश्यक आहे ,खुलेआम बालविवाह करण्यास लोक घ!बरत असले तरीही छुप्या पद्धतिने हे सर्व सुरु असुन सर्व शासकीय विभाग ,लोकप्रतिनिधि, सामाजिक कार्यकर्ता यांना सोबत घेवून याचा प्रचार व प्रसार होने गरजेचे आहे सर्व अधिकारी व नागरीकानी आपली कर्तव्य पार पाडली तर आपला समाज बालविवाहच्या विळख़्यातून मुक्त होईल असेही डाॕ.अशोक गाविञे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना
सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!