banner ads

शब्दगंध साहित्यिक परिषद कोपरगाव कार्यकारीणी जाहिर

kopargaonsamachar
0

 शब्दगंध साहित्यिक परिषद कोपरगाव कार्यकारीणी जाहिर


कोपरगाव - लक्ष्मण वावरे

नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन पुस्तक प्रकाशन करुन उजेडात आणण्यासाठी सदैव तत्पर असणारं शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य, कोपरगाव शाखेच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून अध्यक्षस्थानी सौ. ऐश्वर्याताई संजय सातभाई यांची

एकमताने निवड करण्यात आली आहे. 

सौ. ऐश्वर्याताई संजय सातभाई यांची काव्यसंग्रह प्रकाशित असून कोपरगाव नगरपालिका, ब्राह्मण सभा महिला मंडळ, वनिता महिला मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

कार्याध्यक्षपदी राजेंद्र ( सुधिर ) कोयटे

याची निवड करण्यात आली आहे राजेंद्र कोयटे यांच्या वात्रटिका, चारोळ्या प्रसिध्द असुन यशस्वीपणे सुत्रसंचलन करत आहेत. उपाध्यक्षपदी कैलास साळगट, अजीत कसाब, सचीवपदी स्वातीताई मुळे, सहसचीव म्हणून बाळासाहेब देवकर, खजीनदार म्हणून अ

एड श्रद्धा जवाद, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. संजय दवंगे, प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर, सल्लागार पदी माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे, सौ. उज्वला भोर, सदस्यपदी प्रा मधुमिता नळेकर, एड शितल देशमुख, आनंद बर्गे, सौ. शैलजाताई, रोहोम, नंदकिशोर लांडगे, कार्यालय व्यवस्थापक प्रमोद येवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे 

सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर येथील सुनील गोसावी, राजेंद्र फंड, सुभाष सोनवणे आदींनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कवितेच्या कार्यशाळा, काव्यलेखन स्पर्धा, ग्रंथ उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने शहर व तालुक्यातील सर्व साहित्यीकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!