banner ads

पद्मविभुषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला सलग दुसऱ्या वर्षी ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कार

kopargaonsamachar
0
पद्मविभुषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला सलग दुसऱ्या वर्षी ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कार
 


कोपरगांव - लक्ष्मण वावरे दि.९ डिसेंबर २०२४

कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेला अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व ग्यालेक्सी इन्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्था विभागातील बँको ‘ब्ल्यू रिबन’ पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून संस्थेस दि.३० जानेवारी २०२५ रोजी लोणावळा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिली आहे.

अविज पब्लिकेशन कोल्हापूर, यांचेकडून दरवर्षी सहकार बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या पतसंस्थांना ‘बँको ब्लू रिबन’ हा पुरस्कार दिला जातो. पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शी कारभार करून सर्वच सभासद,कर्जदार,ठेवीदार यांचा अतूट विश्वास संपादन केला आहे. २०२४-२५ चालू आर्थिक वर्षात संस्थेने कोपरगाव येथे नवीन शाखा सुरू केलेली आहे.पतसंस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापनासाठी लागू करण्यात आलेले सर्व निकष संस्थेने तंतोतंत पाळलेले आहेत.कोपरगाव येथील शाखेला ग्राहकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.
कर्मवीर शंकरराव काळे यांनी पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्यपूर्ण प्रगती करत असून संस्थेला सलग दुसऱ्या वर्षी ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कार देण्यात येणार असून हे यश संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहे. त्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे,आ.आशुतोष काळे यांनी संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!