रवंदे शाळेवर सीसीटीव्ही कॅमे-याची नजर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर शाळेत शिक्षक व लोकसहभाग यातून ४० हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही आठ कॅमेरे उपलब्ध करून शाळेमध्ये बसविण्यात आले .
सदर प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले सदर कॅमेऱ्यामुळे शाळेतील सुरक्षितता व शिस्त यावर निश्चित परिणाम होईल असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावातील प्रतिष्ठित व संजीवनी साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव काशिनाथ कदम पाटील यांनी भूषविले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी सीसीटीव्हीचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले सदर उद्घाटन प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरीक पालक व गावकरी उपस्थित होते सर्वांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले






