banner ads

कोइम्बतूर व ऊस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास भेट.

kopargaonsamachar
0
कोइम्बतूर व ऊस संशोधन केंद्राच्या  शास्त्रज्ञांची सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास भेट.



कोपरगांव / प्रतिनिधी 

            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे दरवर्षी ऊस संशोधनासंदर्भांत केंद्रिय पातळीवरील अग्रगन्य ऊस संशोधन संस्था शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, कोइम्बतूर यांच्या तसेच राज्य पातळीवर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या ऊसपिकाचे नविन वाण संशोधनासंदर्भात चाचण्या चालू असतात.
            १९८० साली संजीवनी सहकारी साखर कारखाना लि., यांचे प्रक्षेत्रावर को ७२१९ या ऊस जातीचे संशोधन होऊन को ७२१९ ऊस जातीस "संजीवनी" हे नाव देण्यात आले होते., वरील ऊस संशोधन चाचण्या बघणेकामी कोइम्बतूर येथील प्रमुख ऊस शास्त्रज्ञ डॉ. अण्णा दुराई, डॉ. विक्रांत सिंग, डॉ. ज्योती रेखा पटनायक व ऊस रोग शास्त्रज्ञ (VSI) डॉ. आर. एस यादव यांनी भेट दिली. त्यांचे बरोबर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस शास्त्रज्ञ डॉ. उबाळे व डॉ. गांगुर्डे हे देखील उपस्थित होते.
           यावेळी सजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष  बिपिनदादा कोल्हे , कारखान्याचे अध्यक्ष  विवेक कोल्हे , मॅनेजिंग डायरेक्टर  बाजीराव जी. सुतार यांचेशी बोलताना शास्त्रज्ञ म्हणाले की, सजीवनाच्या कार्यक्षेत्रातील जमीन, पाणी व वातावरणात जास्त ऊस व साखरेचे उत्पादन देणाऱ्या ऊस जातीची पैदास करण्यासाठी या चाचण्यांचा निश्चित उपयोग होईल.   त्याकामी कोइम्बतूर व पाडेगाव येथील ऊस संशोधन संस्थांचा या कामी कायमच सहकार्य राहील असे ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव चे शास्त्रज्ञ डॉ. उबाळे म्हणाले.
          तसेच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस किडरोग नियंत्रण व ऊस पिक सिंचन याकामी मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी सांगितले.
          याकरीता कार्यक्षेत्रातील जमिनीचे माती पाणी परीक्षण रिपोर्ट कोइम्बतूर व पाडेगाव येथील शास्त्रज्ञांना देण्यात यावे व त्यानुसार ऊस पिक जोपासनेचे मार्गदर्शन घ्यावे असे निर्देश कारखान्याचे अध्यक्ष  विवेक  कोल्हे यांनी दिले. यावेळी आलेल्या सर्व शास्त्रज्ञांचा सत्कार कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर  बाजीराव जी. सुतार याचे हस्ते करण्यात आला. कारखान्याचे जनरल मॅनेजर  शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर  जी. बी. शिदे, ऊस विकास अधिकारी  शिवाजीराव देवकर व त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!