banner ads

कोपरगावचे लोकसभा निवडणूक कामांचे मानधन रखडले.

kopargaonsamachar
0

 कोपरगावचे लोकसभा निवडणूक कामांचे मानधन रखडले.


  लक्ष्मण वावरे /  कोपरगांव 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत 

२१९ कोपरगाव विधानसभा मतदार संघात निवडणूक कर्तव्य पार पाडणे कामी विविध विभागाकडील अनेक अधिकारी व कर्मचारी यांची विविध पथकात नेमणूक करण्यात आलेली होती या कामांचे मानधनही दिले जाते अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा संघांपैकी अकरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्याचे मे २०२४ चे मूळ वेतनाप्रमाणे मानधन अदा करण्यात आलेली आहेत मात्र कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप पावतो लोकसभा सावत्रिक निवडणुकीचे मानधन अदा केलेले नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे.

  मुख्य निवडणूक निर्णय    अधिकाऱ्यांच्या     आदेशानुसार  सर्व कर्मचारी व  अधिकारी  यांनी निवडणुकीचे प्रथम कर्तव्य म्हणून  सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या व अचूकपणे पार पाडली त्यासाठी स्वतंत्रपणे मानधनही दिले जाते जिल्हातील इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांना  मानधन दिले फक्त  कोपरगांव तालुक्यातीलच  निवडणूकीत काम केलेल्या या कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत मानधन न मिळाल्याने ते त्वरीत मिळावे अशी मागणी केली आहे.सदर कर्मचाऱ्यांनी  आपल्या सही निशी मुख्य निवडणूक अधिका-यांना लेखी दिलेल्या पञात  म्हटले आहे की     संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक कालावधीत केलेल्या कामाचे अति कालिक भत्त्याचे पत्र विहित नमुन्यात तयार करून तहसीलदार कोपरगाव निवडणूक शाखा येथे सादर केलेले आहेत लोकसभा  सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन अनुदान जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर प्राप्त झालेली आहे कर्मचारी मानधन वगळता इतर सर्व देयके तालुकास्तरावरून अदा करण्यात आलेली आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा संघांपैकी अकरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्याचे मे २०२४ चे मूळ वेतनाप्रमाणे मानधन अदा करण्यात आलेली आहेत मात्र कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप पावतो लोकसभा सावत्रिक निवडणुकीचे मानधन अदा केलेली नाहीत सदरबाबत तहसील कार्यालय कोपरगाव येथे वारंवार संपर्क चौकशी केली असता निधी नाही असे सांगून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहे तरी सदर बाबत आपले स्तरावरून योग्य तो आदेश होऊन अधिकारी व कर्मचारी यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामकाजाचे मानधन मिळावे  अशी मागणि कर्मचाऱ्यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!