banner ads

केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २७ वर्षानंतर स्नेहमेळावा

kopargaonsamachar
0

 केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २७ वर्षानंतर स्नेहमेळावा 

कोपरगांव / लक्ष्मण वावरे

             विद्यार्थी दशेत असतांना शिक्षणाला महत्व देत त्यानुरूप जीवनाची दिशा ठरविण्यांसाठी ज्ञान हेच अंतिम ध्येय असल्याची शिकवण मिळवली आणि त्याच शिदोरीवर वाटचाल सुरू आहे जीवनांतील सुख-दुःखे वर्ग मित्रांना वाटुन हलकी करावी या उददेशांने कोपरगांव येथील कर्मवीर भाउराव पाटील केबीपी विद्यालयात १९९७.९८ या शैक्षणिक वर्षात दहावी इयत्तेत शिकणा-या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २७ वर्षानंतर नुकताच पार पडला त्यात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोमनाथ परजणे व त्यांच्या मित्र परिवारांनी या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन केले. 

           जीवाभावाच्या नात्यापेक्षा प्रत्येकाच्या जीवनांत मित्राला विशेष महत्व आहे. शिक्षण घेतांना येणा-या अडचणी सोडविण्यांत त्यांचा त्या काळी असलेला सहभाग किती महत्वाचा होता याची जाणीव अनेकांना यावेळी झाली. 

          बहुजन वंचितांच्या दारी शिक्षणाची गंगोत्री नेणा-या कर्मवीर भाउराव पाटील यांच्या पुतळ्यास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. प्रारंभी श्री. सागर शहा यांनी प्रास्तविक केले. १९९७.९८ मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत असतांना बरोबरचे सवंगडी विद्यार्थी २७ वर्षानंतर दिवाळीनिमीत्त एकत्र आले त्यामुळे अनेकांच्या जुन्या स्मृती पुन्हा उजळल्या. त्यातुन एकमेकांच्या प्रगतीचा आढावा घेतला.  वैभव आढाव, किरण दहे, शिंगाडे आदि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन शिक्षण घेत असतांना व त्यानंतर आयुष्यात काय प्रगती केली याचे सौदाहरण स्पष्टीकरण दिले. शिक्षण घेत असतांना आपल्यातीलच विद्यार्थी कुणी अभियंते, डॉक्टर, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, वकील होईल याची पुसटशी कल्पना नव्हती पण २७ वर्षानंतर एकत्रीत जमलेल्या मित्र परिवाराच्या प्रत्येकाच्या चेह-यावर समाधानाचे भाव होते. खेडयापाडयातील उपेक्षीतांना शिक्षण देत ज्ञानाचा प्रवाहात आणण्याचे महान कार्य डॉ कर्मवीर भाउराव पाटील यांनी केले आणि त्यांच्यामुळे जीवन काय आहे हे समजण्याचे धडे मिळाले याची प्रत्येकाला शाळेत एकत्रीत जमल्यावर आठवण झाली. गणेश थोरात यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना अल्पोहार देत पुन्हा पुढच्या वर्षी नव्या उमेदीने एकत्रीत जमायचे हा संदेश घेत या स्नेहमेळाव्याचा निरोप घेतला. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्यातीलच अडचणींत असलेले मित्र व त्याचे कुटूंबियांसाठी एक हात मदतीचा उपक्रम चालु ठेवलेला आहे

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!