banner ads

नाशिकच्या वृक्षतोड आंदोलनात कोपरगावकरांचा सहभाग

kopargaonsamachar
0

 

नाशिकच्या वृक्षतोड आंदोलनात कोपरगावकरांचा सहभाग 


कोपरगाव समाचार:-
सध्या नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी अठराशे झाडे तोडण्याचे महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्याविरोधात मोठे आदोलन उभे राहिले आहे.या आंदोलनास कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे.कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे कार्यकर्ते समाधान कंदे हे कोपरगावहून सायकल चालवत नाशिकच्या तपोवनात पोहचले. कोपरगाव ते तपोवन हे नव्वद किलोमटरचे अंतर भल्या थंडीत आठ तासात कापले. तपोवनात त्यांनी वृक्षाचे महत्त्व सांगत प्रबोधन केले.

तपोवनाच्या जंगलात तीन दिवस तंबूत राहुन वृद्धतोड विरोधी आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या या नाविन्यपुर्ण आंदोलनाबद्दल नाशिककरांनी त्यांची आस्थेने चौकशी करुन त्यांचे कौतुक केले.चासनळी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे हेही वृक्षतोड विरोधी आंदोलनात सुरुवातीपासून सहभागी आहेत.
दररोज ते विविध मार्गाने प्रबोधन व आंदोलन करत असतात. कोपरगावच्या गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी १६ नोव्हेंबर ला तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी पहिला व्हिडिओ सोशल मिडिया वर सोडला होता चासनळी येथील मायभुमी सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते सचिन चांदगुडे यांचाही तपोवनातील झाडे वाचली पाहिजे यासाठी पाठिंबा दिला आहे. यांच बरोबर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे नाशिकच्या प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!