banner ads

मुस्लिम बांधव विवेक कोल्हे यांच्यासोबत ताकतीने उभे - सलीमभाई पठाण

kopargaonsamachar
0

 

मुस्लिम बांधव विवेक कोल्हे यांच्यासोबत ताकतीने उभे - सलीमभाई पठाण


मतांसाठी राजकारण करणारा नाही तर संकटात माणूसकी जपणारा कोल्हे परिवार - अमीर पठाण
कोपरगाव समाचार : - कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला मोठे संघटनात्मक बळ मिळाले असून, प्रभाग क्रमांक १० मधील मुस्लिम बांधवांनी जाहीर पक्षप्रवेश करत भाजपावर व कोल्हे परिवारावर विश्वास व्यक्त केला आहे. मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


मुस्लिम बांधव विवेक कोल्हे यांच्यासोबत ताकतीने उभे, मोठा विजय होणार आहे सलीमभाई पठाण म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले की, विवेक कोल्हे हे सर्वसमावेशक नेतृत्व देणारे असून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्यासोबत ताकतीने उभे राहून मोठा विजय निश्चित करणार आहोत.पराग संधान नगराध्यक्ष होतील यात कुणालाही आता शंका उरली नाही त्यासह सर्व नगरसेवक मोठ्या मतांनी निवडून येतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मतांसाठी राजकारण करणारा नाही तर संकटात माणूसकी जपणारा कोल्हे परिवार आहे असे अमीर पठाण म्हणाले.पठाण यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, आम्ही विरोधकांकडे होतो तेव्हा फक्त गर्दी पुरते आम्हाला वापरले पण जेव्हा आमच्यावर वैद्यकीय संकट आले तेव्हा हात वर केले त्यावेळी आम्ही विवेकभैय्या कोल्हे यांना संपर्क केला त्यांनी आमचा पक्ष पाहिला नाही थेट माणुसकी म्हणून मदत केली त्यामुळे कोल्हे परिवार हा मतांसाठी राजकारण करणारा नाही, तर संकटाच्या वेळी माणूसकी जपणारा परिवार आहे. समाजाच्या अडचणी, दुःख आणि प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी पुढे असतात. त्यामुळेच आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.



या पक्षप्रवेशात सलीमभाई पठाण, अमीर पठाण, विकी पठाण, अरबाज पठाण, परवेज शेख, सोहेल पठाण, इमरान शेख, अरबाज मणियार, साहिल पठाण, सोहेल शेख, समीर मणियार, रिहान शेख, सुरेश लहाने, शोएब शेख, निसार पठाण, अमीन पठाण, सुलतान शेख, सादिक शेख, जावेद शेख, सादिक सय्यद आदी मान्यवरांचा समावेश होता.या प्रभावी नेतृत्वांच्या पक्षप्रवेशामुळे कोपरगाव मतदारसंघातील भाजपाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला निर्णायक यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!