युवकांना बेरोजगार करण्याचे पाप आ.काळेंचेच -- विवेक कोल्हे
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही कोपरगाव वाशीयांचा हिरमोड झाला असून शहरातील रस्ते अद्याप खड्डे आणि धूळ युक्त आहेत त्यामुळे आमदार कोपरगाव शहराच्या विकासात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे टीका विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर केली आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना विश्रामगृहावर कोपरगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी केशवराव भवर ,माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर ,राजेंद्र शिंदे,
नारायण अग्रवाल , राजेंद्र बागुल ,मच्छिंद्र केकान ,शरद थोरात, विश्वास महाले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की आमदार काळेंकडे एक हाती सत्ता असूनही कोणताही विकास झाला नाही मात्र माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कमी काळात अनेक विकास कामांचा विक्रम केला शहरात नाट्यगृह, दोन्ही पोलीस स्टेशन इमारत, पंचायत समिती, बस स्थानक, अग्निशामक दल, पालिका सार्वजनिक वाचनालय, सह अनेक इमारतींचे कामे केली .आ.काळे यांनी ७२ किमी शहरातील रस्ते त्यावर तीस कोटी खर्च केले तरीही कोणताही रस्ता खड्डा मुक्त झाला नाही पेवर ब्लॉकच्या कामात मोठा भ्रष्टाचार करून तेच पैसे कोणाची बंगले बांधण्यासाठी गेले का असा सवाल त्यांनी केला शहरातील गटारी व्यवस्थित नाही शहरातील सामाजिक सभामंडपांना गेल्या वर्षभरात निधी मिळाला नाही गेल्या चार वर्षात कधीच दररोज पाणी दिले नाही वर्षातून फक्त ६० ते ७० दिवस पाणीपुरवठा केला आणि ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसूल केली पाचव्या तलावाचा मोठा गाजावाजा केला पण अजूनही पाणी दररोज दिले जात नाही उलट पाणीपुरवठा विभागाचा खर्च वाढला .
आमदार काळे यांनी निवडणुकीपूर्वी अनेक समाजांना सभा मंदिराची पैसे देत असल्याचे जाहीर केले मात्र दोन समाज मंदिर सोडले तर कोणालाही निधी मिळालेला नाही ..
मृत जनावरांची विल्हेवाट लावताना पालिकेच्या कारभारात अजब घोटाळा झाल्याचे आकडे सांगताना कोल्हे म्हणाले की एक मृत जनावर उचलण्यासाठी पालिका संबंधित ठेकेदाराला १२० रुपये देते फेब्रुवारी २०२३ मध्ये एकाच महिन्यात तब्बल ४१ गाढव ७१ कुत्री, ६० डुकरे व ८ गायी वासरे मृत झाले व त्याची विल्हेवाट लावल्याचे दाखवत एकवीस हजार रुपये बिल काढण्याचा प्रताप करण्यात आल्याचेही कोल्हे यांनी उघड केले.असुन ते म्हणाले की मुख्याधिकारी सुहास जगताप यांची बढती झाल्याने त्यांची त्वरित बदली व्हायला पाहिजे मात्र ते अजूनही येथेच खुर्चीला चिकटून बसले आहेत ते काहीतरी काळबेर दडपण्याची शक्यता असल्याचे कोल्हे म्हणाले.कोपरगावची जनता सुज्ञ आहे यावेळी आमदार काळे यांना नाकारणार आहे आम्ही स्थानिक पातळीवर मित्रपक्षांबरोबर आघाडी करून जनतेच्या मनातील सुज्ञ व नवे चेहरे पालिकेत पाठवून जनतेच्या मनातला विकास करण्याचे अभिवचन देत आहोत असे सांगून कोल्हे यांनी काळे विरुद्ध नगरपालिका निवडणुकीचे रणसिंग फुंकले.






