महायुतीचा धर्म पाळला नाही तर नगरपालिका स्वतंत्र लढवणार -- शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे
कोपरगावात सौ परिगाबाई राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कोपरगाव.-- लक्ष्मण वावरे
.महाराष्ट्र राज्याचे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विविध घटकांना न्याय देताना लोकाभिमुख काम केले. जनतेतील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली. त्यांच्या कामावर प्रभावीत होऊन महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे. त्याच धर्तीवर प्रभाग 14 मधील सौ परिगाबाई राठोड, सुनील राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र जर इतरांनी महायुतीचा धर्म पाळला नाही तर शिवसेना पक्ष स्वतंत्रपणे नगरपालिका निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याचे सुतोवाच शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.
ते कोपरगाव येथे प्रभाग क्रमांक 14 मधील कार्यकर्त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देताना बोलत होते.
यावेळी शिवसेना नेते सागर बेग, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव,सनी गायकवाड, युवा सेना प्रमुख अभिषेक आव्हाड, सुनील साळुंखे,मनील नरोडे, भुषण मोरे, अमोल लोखंडे, अनंत आढाव अदीसह
शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना नेते सागर बेग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कुठलेही बंधन नव्हते. वर्षा बंगल्यावर सर्वसामान्यांच्या समस्या ऐकण्यासाठी ते सदैव हजर होते.
लाडकी बहीण योजना चालू करून त्यांनी सर्व महिलांना सर्वांना न्याय दिला. प्रभाग 14 मधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुमच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. काळजी करू नका युती झाली नाही तरी नगरपालिका लढण्यास तयार रहा असे त्यांनी सांगितले.
शेवटी आभार शिवसेना शहरप्रमुख अक्षय जाधव यांनी सांगितले.






