banner ads

राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत तळेगाव ते झगडेफाटा रस्त्याचे काम करावे.

kopargaonsamachar
0

 राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत तळेगाव ते झगडेफाटा रस्त्याचे काम करावे.


शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी 
कोपरगाव -- लक्ष्मण वावरे 
 कोपरगाव झगडेफाटा ते तळेगाव या रस्त्याची अवजड वाहतूक तोलण्याची क्षमता कमी झाली आहे. अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. वेळोवेळी या रस्त्याला निधी मंजूर होतो मात्र तो तूटपुंजा असल्याने  या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही परिणामी  नागरिकांना व वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या रस्त्याचे काम आशियाई विकास बॅक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे या रस्त्याची पार्श्वभूमी त्यांनी सांगितली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,राममा २२२  संगमनेर तळेगांव कोपरगाव (रा.मा.६५) कि.मी. ८२/००० ते १०३/२०० तळेगाव ते झगडेफाटा  हा रस्ता राज्य मार्ग दर्जाचा असून ७.००मी रुंदीचा आहे. ही लांबी सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव यांचे अखत्यारीत आहे. सदर रस्ता उत्तरेस कोपरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग १६०, १६०ब, ७५२जी, ७५२आय व दक्षिणेस तळेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग १६० डी यांना जोडणारा असून प्रसिद्ध धार्मिक स्थळ शिर्डी, शिर्डी विमानतळ व समृद्धी महामार्गाचे इंटरचेंज (कोकमठाण) याना जोडणारा आहे. सदर रस्ता हा मालेगाव - मनमाड व कोपरगाव कडून पुणेला जाणेकरिता जवळचा मार्ग असून शिर्डी विमानतळ व ओझर विमानतळ यांना देखील जोडणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावरून नगर- मनमाड (राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० व ७५२ जी) तसेच रा.म.मा १६०ब, ७५२आय, १६० डी ची जड व अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. शिर्डी येथे वेळोवेळी होणाऱ्या धर्मिळ कार्यक्रम व उत्सव काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी नगर मनमाड या रस्त्यावरून होणारी जड व अवजड वाहतूक वेळोवेळी या रस्त्यावरून वळविण्यात येत असते.

सदर रस्ता गोदावरी नदीचे खोरे तसेच त्यावर असणाऱ्या धरणाचे पाणलोटक्षेत्रात असल्याने बहुतांश लांबी बागायती क्षेत्रातून तसेच काळ्या मातीच्या भूभागातून जाणारी आहे. कोपरगाव तालुक्यात दोन साखर कारखाने त्याच बरोबर लगतच्या राहाता तालुक्यातील दोन तसेच संगमनेर तालुक्यातील एक अशा एकूण पाच साखर कारखान्यांकरिता या रस्त्यावरून ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच शेतकऱ्यांचा शेती माल तालुक्याच्या ठिकाणी तसेच नाशिक येथील बाजारपेठेत आणणेकरिता या रस्त्याचा वापर करण्यात येतो.सद्यस्थितीत सदर रस्ता जागोजागी खराब झालेला असून २०२६ मधील नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे शिर्डीला येणारे तसेच शिर्डी विमानतळाकडून नाशिकला जाणारे भाविक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणार आहेत. सदर रस्त्याचे महत्त्व तसेच भविष्यातील वाढती लोकसंख्या व वाहन संख्या विचारात घेता रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरण (कॉक्रीटीकरण) होणे गरजेचे आहे. 
 तळेगांव ते झगडेफाटा एकूण लांबी-२१.२० किमी  या रस्त्याचे काम आशियाई विकास बॅक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत होणेकरिता आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे  शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!