banner ads

कोपरगाव शहरातील विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध -आ.आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 कोपरगाव शहरातील  विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध -आ.आशुतोष काळे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे.त्या निधीतून कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील एकूण १४.८८ कोटीच्या विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली .
जाहिरात 
कोपरगाव शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळविल्यापासून तर निविदा प्रसिद्ध होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरु असतो.विकासाच्या बाबतीत कोपरगाव मतदार संघ जिल्ह्यात क्रमांक एकवर घेवून जायचा आहे व कोपरगाव शहराची देखील विकसित शहर म्हणून नवीन ओळख निर्माण करायची आहे 

 अथक प्रयत्नातून शहराचा काही दशकांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच  शहरातील प्रमुख रस्त्यांचा विकास करून शहर सुशोभिकरण, प्रत्येक प्रभागातील रस्ते पूर्ण करून नागरीकांच्या अडचणी दूर केल्या.व पुन्हा एकदा १४.८८ कोटीच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यामध्ये कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्ते,गटार, पेव्हर ब्लॉक बसविणे, पूल तयार करणे, वॉल कम्पाऊंड बांधणे,सुशोभिकरण करणे, सभामंडप व सामाजिक सभागृह बांधणे,कब्रस्तान दुरुस्ती, व्यायाम शाळा दुरुस्ती अशा विविध विकासकामांचा समावेश आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या प्रत्येक प्रभागात आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकास पोहोचणार असून नागरिकांना अपेक्षित असलेला विकास होणार आहे. कोपरगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली होती या निविदांच्या माध्यमातून लवकरच त्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु होवून काही महिन्यांमध्ये नागरिकांच्या अडचणी कायमच्या दूर होणार  आहे. कोपरगावला अहिल्यानगर जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत क्रमांक एक वर नेण्याचा संकल्प केलेला आहे.त्यासाठी कोपरगावकरांचे सहकार्य आणि विश्वास माझ्या सोबत असून हीच माझ्या कामाची ऊर्जा असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

                  

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!