banner ads

कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीला राज्यस्तरीय तिस-या क्रमांकाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार

kopargaonsamachar
0

 कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीला राज्यस्तरीय तिस-या क्रमांकाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार

 
कोपरगांव  ( लक्ष्मण वावरे )
    महाराष्ट्र राज्य़ बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत, पुणे यांच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट़ कामगिरी करणा-या बाजार समित्यांना मा.वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळयात नाशिक विभागातुन कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीने उत्कृष्ट़ कामगिरीचा मान पटकावत तिस-या क्रमांकाचा मानाचा मा.वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळवून आपल्या कार्याचा राज्य़भर ठसा उमटविला आहे.

उत्कृष्ट़ कामगिरी, पारदर्शक  कारभार, शेतक-यांच्या मालाला योग्य़ भाव मिळवून देणे,  त्यांच्या मालाची खरेदी विक्री सुलभ करणे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध़ करून देणे, सलग अ वर्ग, भरीव वाढावा, शेतक-यांना रोख पेमेंट, काँक्रीटीकरण, जनावरे, भाजीपाला, उपबाजार येथे शेतकरी वर्गाला दिलेल्या सुविधा आणि शेतक-यांच्या हिताला प्राधान्य़ देणा-या योजनांचा सखोल आढावा घेऊन बाजार समितीने केलेल्या उत्कृष्ट़ कामगिरीची दखल घेवून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळयात महाराष्ट्र राज्य़ बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष  बाळासाहेब नाहाटा, उपाध्यक्ष  सुर्यवंशी, संचालक ॲडव्होकेट .सुधीर कोठारी, श्री.मानकर तसेच महिला संचालिका यांच्या हस्ते सन्मानचिन्ह़ देऊन हा पुरस्कार कोपरगांव बाजार समितीला प्रदान करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती .साहेबराव रोहोम, उपसभापती .गोवर्धन परजणे, सन्मा. संचालक सर्वश्री.साहेबराव लामखडे, खंडु फेपाळे, रामदास केकाण,  प्रकाशराव गोर्डे, बाळासाहेब गोर्डे, ऋषीकेश सांगळे, रेवननाथ निकम, लक्ष्मणराव शिंदे, संजयराव शिंदे, शिवाजीराव देवकर, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोकराव नवले, रामचद्र साळुंके, सौ.मिरा कदम, सौ.माधुरी डांगे, यांच्यासह सचिव  नानासाहेब रणशुर उपस्थित होते. 

              आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे, राजेश  परजणे, नितीन औताडे यांचे मार्गदर्शना खाली बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती.गोवर्धन परजणे व सर्व सन्मा.संचालक हे बाजार समितीचा कारभार उत्कृष्ट़ व पारदर्शक करीत असुन मागील तीन वर्षात अनेक  उपक्रमाव्दारे बाजार समितीने आदर्श कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभुमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीने वेगळेपण सिध्द़ करून तिस-या क्रमांकांचा हा मानाचा बहुमान मिळवला आहे. या यशाबद्दल सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती  गोवर्धन परजणे, सचिव  नानासाहेब रणशुर यांनी सर्व सदस्य़, अधिकारी, कर्मचारी, खरेदीदार  व्यापारी, हमाल मापाडी वर्ग व इतर बाजार घटकांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे हे शक्य़ झाले असुन या पुरस्काराने समितीच्या कार्याला नवी उर्जा मिळाली आहे. यापुढेही बाजार समितीचे हिताचे कामे करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी तत्प़र व अधिक उपयुक्त़ व नावीण्य़पुर्ण उपक्रम राबवून सुविधा उपलब्ध़ करून देण्याचा निर्धार व्यक्त़ केला आहे.
                

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!