banner ads

कोपरगावमधून देखील बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर घडतील - रेणुका कोल्हे

kopargaonsamachar
0

 कोपरगावमधून देखील बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर घडतील - रेणुका कोल्हे 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )


 रणनीती, संयम आणि विचारशक्तीचा कस घेणाऱ्या विवेक कोल्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं रंगतदार आयोजन कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस-स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. युवानेते विवेक कोल्हे यांच्या प्रेरणेतून होणाऱ्या या स्पर्धेचे हे चौथं वर्ष आहे. या स्पर्धेचं उद्घाटन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते संत जनार्दन स्वामी आश्रम (पुणतांबा फाटा) येथे उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना सौ. रेणुका कोल्हे म्हणाल्या, बुद्धिबळ हा खेळ केवळ स्पर्धाच नव्हे, तर विचारशक्तीला धार लावणारा एक मानसिक व्यायाम आहे. आधुनिक काळात तरुणाईला संतुलित निर्णयक्षमता आणि संयम शिकवणारा हा खेळ प्रत्येकाने आत्मसात करावा. या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपली चमक दाखवण्याची संधी मिळते ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

युवानेते विवेक कोल्हे यांचे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धेला मिळणारे सक्रिय पाठबळ, त्यांच्या पुढाकारामुळे कोपरगावातील बुद्धिबळ चळवळीला नवीन दिशा लाभली आहे. स्पर्धेच्या आयोजनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम, जिल्हा व तालुकास्तरीय बक्षिसांची योजना, तसेच मुलींना स्वतंत्र गट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा एकूण ६४ रोख व १३२ चषकांचे बक्षिसवाटप करण्यात येणार असून, ११, १४, १९ वर्षांखालील व खुला असा चार गटांमध्ये स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे अहमदनगर, नाशिक व छ. संभाजीनगर जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी स्वतंत्र बक्षिसं, तसेच कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनाही प्रोत्साहनपर बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. सागर गांधी (सोलापूर) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्बिटर स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत.
या निमित्ताने कोपरगाव शहर विचारशक्तीच्या स्पर्धेने गजबजणार असून, बुद्धिबळ प्रेमींसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे.खेळातूनच व्यक्तिमत्व विकास घडतो. विवेकभैय्यांना आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देखील देश आणि जगपातळीवर चमकावा असे वाटते असे सौ. रेणुका कोल्हे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले.
लायनेस क्लब चे अध्यक्ष अंजली थोरे, एसटी कामगार संघटना सचिव संजीव गाडे, कोपरगाव तालुका क्रीडा समिती धनंजय देवकर, सचिव अनुप गिरमे, नितीन सोळके, प्रमोद वाणी, संकेत गाडे, महेश थोरात, राजेंद्र कोळपकर आदीसह खेळाडू, प्रशिक्षक,मान्यवर उपस्थित होते.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!