banner ads

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी सोमनाथ बोरनारे यांची नियुक्ती

kopargaonsamachar
0

 कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी सोमनाथ बोरनारे यांची नियुक्ती


कोपरगाव/ लक्ष्मण वावरे
- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी सोमनाथ शिवाजीराव बोरनारे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत हि नियुक्ती करण्यात आली आहे.

वेगाने बदलणाऱ्या राज्यातील साखर उद्योगाच्या व्यवस्थापनाची धुरा सक्षमपणे पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक कार्यक्षम असणे गरजेचे असल्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ५० कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल तयार करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाकडून १८ एप्रिल २०२२ ला निर्णय घेण्यात आलेला होता. व या ५० कार्यकारी संचालकांच्या पॅनलमधील अनुभवी उमेदवाराची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करणे साखर आयुक्तालयाच्या आदेशानुसार बंधनकारक होते. या पॅनलमध्ये कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अकौंट विभागातील सोमनाथ शिवाजीराव बोरनारे यांचा देखील समावेश होता.

सोमनाथ बोरनारे मागील तेरा वर्षापासून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सेवेत असून मागील चार वर्षापासून फायनान्स मॅनेजर म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्ठपणे सांभाळत होते. त्यांच्या सेवेचा अनुभव लक्षात घेवून संचालक मंडळाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांची कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी एकमताने नियुक्ती केली. यावेळी कारखाना आणि उद्योग समुहाचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देतांना नवनिर्वाचित कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी सांगितले की,आशिया खंडातील दुसऱ्या सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी काम करण्याची संधी मिळणे हि खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासून कारखान्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जाण्याचा कर्मवीर शंकरावजी काळे यांनी जो आदर्श घालून दिला आहे त्या आदर्शावर सुरु असलेली वाटचाल यापुढे अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!