banner ads

संजीवनीची निकिता खैरनार कॉमर्स शाखेत तर भक्ति धाडीवाल आणि समर्थ शिकारी सायन्स शाखेत प्रथम

kopargaonsamachar
0

 संजीवनीची निकिता खैरनार कॉमर्स शाखेत तर भक्ति धाडीवाल आणि समर्थ शिकारी   सायन्स शाखेत  प्रथम


१००  टक्के निकालाची परंपरा कायम
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
 महाराष्ट्र  राज्य उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रवारी-मार्च, २०२५ मध्ये घेतलेल्या इ. १२ वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले असुन यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजचा कॉमर्स व सायन्स शाखेचा  निकाल १०० टक्के लागला. संजीवनी ज्यु. कॉलेजने उकृष्ट  निकालाची परंपरा कायम राखली आहे.

 कॉमर्स शाखेत  निकिता नानासाहेब खैरनार हिने ९२. ८३ टक्के गुण मिळवनु प्रथम गुणानुक्रमांकाची माणकरी ठरली. सायन्स शाखेत  भक्ती कल्पेश  धाडीवाल हीने व समर्थ सुनिल धाडीवाल याने प्रत्येकी ८९ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला, अशी  माहिती संजीवनी ज्युनिअर कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.  

          पत्रकात पुढे म्हटले आहे की  कॉमर्स शाखेत  गौरी  संदिप देवकर हिने ९०. ६७ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला तर सुयश  अनिल खैरे याने ८९. ३३ टक्के मिळविलेे व तिसऱ्या  गुणानुक्रमांकावर मोहर उमटवली. सायन्स शाखेत अश्विनी  गोरखनाथ म्हस्के हिने ८७. ८३ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या  क्रमांकाची मानकरी ठरली तर दर्शन  प्रविण कापसे याने ८६. ५० टक्के गुण मिळविले आणि तिसऱ्या  क्रमांकाने उत्तिर्ण झाला.
कॉमर्स विभागातुन एकुण ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९० टक्यांच्या वरती दोन विद्यार्थ्यांनी गुण मिळविले. ८०  ते ८९  टक्यांमध्ये २३ व ७०  ते ७९  टक्यांमध्ये ३०  विद्यार्थी उत्तिर्ण झाले. सायन्स विभागात एकुण ३२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ८०  ते ८९  टक्यांमध्ये १८  व ७०  ते ७९  टक्यांमध्ये ६३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले.
        संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे भाग्यवान पालक तसेच प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे  व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
  
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!