banner ads

संदीप गुरुळे संजीवनी पतसंस्थेचे नुतन व्हा.चेअरमन

kopargaonsamachar
0

 संदीप गुरुळे संजीवनी पतसंस्थेचे नुतन व्हा.चेअरमन 


सल्लागार पदी पराग संधान व महेंद्र नाईकवाडे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )


युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन पदी संदीप गुरुळे यांची निवड करण्यात आली.तर सल्लागार म्हणून अमृत संजीवनचे चेअरमन पराग संधान आणि युवा उद्योजक महेंद्र नाईकवाडे यांची निवडणूक अधिकारी श्री.रहाणे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.

संजीवनी सहकारी पतसंस्था अतिशय दूरदृष्टीने माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केली होती.या पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदार आणि खातेदार यांना तत्पर सेवा देण्यात येते.अतिशय दर्जेदार आर्थिक आलेख असणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त आहे.अशा संस्थेवर वरील पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ. स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी चेअरमन प्रदीप नवले आणि मा. व्हा.चेअरमन राजेंद्र परजणे यांच्यासमवेत संचालक मंडळाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संचालक शिवाजीराव लहारे,भाऊसाहेब आदिक, राजेंद्र बागुल,श्रीकांत चांदगुडे, सौ.मंदाकिनी बडवर, सौ.मनिषा राऊत आदी उपस्थित होते.शेवटी आभार मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. व्ही. रोहमारे यांनी मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!