भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोपरगावात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येवून तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला व त्यात २८ जण मृत्यूमुखी पडले, हे कृत्य अत्यंत निंदनीय, अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारे आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे, पर्यटकांचे प्राण गेले हे अत्यंत दुःखदायक आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवेदन देण्यात आले आहे
केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच, हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करीत पहेलगाम येथील पर्यटकांवरील व नागरिकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत
केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यातून जम्मू-काश्मीर परिसरात जाणाऱ्या प्रत्येकांची सुरक्षा सुनिश्चित करावी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर राज्यातील सर्व पर्यटन व धार्मिक यात्रांना विशेषता जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या पवित्र अमरनाथ यात्रेस योग्य ते संरक्षण द्यावे ही एक संवेदनशील घटना असून संपूर्ण देश या दुःखद घटनेने व्यथीत झाला आहे याबाबत केंद्र सरकारने योग्य ती तत्परता दाखवणे गरजेचे आसल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी शिवसेना नेते राजेंद्र झावरे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॕड. संदीप वर्पे,पप्पू पडियार ,इरफान शेख ,शहर प्रमुख सनी वाघ, कलविंदर सिंग ,मनोज कपोते, शेखर कोलते, बापू रांधवणे, गौतम बनसोडे, सुनील वर्पे, माजीद पठाण ,दिनेश पवार ,असिफ शेख ,अॕड दिलीप लासुरे ,भावेश थोरात ,निखिल थोरात ,शुभम शिंदे, ओवेस शेख ,मोबीन शेख, सुरेश मोकळ ,सुरेश आसणे, स्वप्निल पवार ,रिंकू मगर ,अशपाक शेख ,ऋतुराज काळे,आदि उपस्थित होते.यावेळी शिवसेना नेते राजेंद्र झावरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.





