महिला सक्षम तर देश सक्षम .-- सौ.विमल पुंडे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
'महिलांना केवळ वित्तीय सहाय्य देणे पुरेसे नसते, तर त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, परवाने आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले तर त्या अधिक यशस्वी होतील असे मनोगत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. विमल पुंडे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव येथील नवक्रांती महिला उद्योजकता प्रशिक्षण अकॅडमी तर्फे आयोजित उद्योग व्यवसायासाठी मोफत शॉप ॲक्ट लायसन्स वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्र शासनाच्या 'स्किल इंडिया' उपक्रमांतर्गत महिलांसाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. यावेळी
अनेक महिलांना शॉप ॲक्ट लायसन्स बहाल करण्यात आले.
या कार्यक्रमास संभाजी नगर येथील विशाल सुरडकर , संस्थेच्या राजश्री बागुल, पत्रकार बिपिन गायकवाड व दत्ता पुंडे, शांताराम रणशूर व अनेक प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.




