banner ads

तिळवणी येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला ग्रामसभेचे आयोजन

kopargaonsamachar
0


तिळवणी येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला ग्रामसभेचे आयोजन


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 संत सदगुरु गाडगेबाबा  सार्वजनिक वाचनालय तिळवणी येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला ग्रामसभेचे आयोजन करुन महिलांचा सन्मान करत महिलादिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिळवणी गावच्या माजी सरपंच राजश्री मनोज बागुल  होत्या. याप्रसंगी सावित्रीबाई फुले व संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अशोक राहाणे यांनी केले तर सूत्रसंचालन  लक्ष्मण पंडोरे  यांनी केले यावेळी कु. श्रद्धा बाळासाहेब सावळे आणि अंकिता नानासाहेब खिलारी यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मत व्यक्त केले तर सौ.सविता शिंदे यांनी उपस्थित सर्व महिलांना बचत गटाविषयी मार्गदर्शन केले समाजाचे संतुलन राखायचे असेल तर मुली जन्माला यायला हव्यात त्यांना उत्तम शिक्षण उपलब्ध करून द्यावे असे मत मुख्याध्यापक  लक्ष्मण पंडोरे यांनी व्यक्त   केले तर आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून का साजरा केला जातो याविषयीची पार्श्वभूमी स्त्रियांचे आरोग्य आणि स्वच्छता याविषयी मत व्यक्त केले याप्रसंगी अंगणवाडीच्या आशा वाघ, अश्विनी शेळके, सविता शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले जीवनात बचत किती महत्त्वाची आहे बचत असेल तर आपले सामाजिक आणि शारीरिक, आर्थिक विकासात हातभार लागेल कुटुंबाला आधार मिळेल अशा प्रकारचे मत सीआरपीओ  सविता शिंदे यांनी व्यक्त केले. माजी सरपंच राजश्री बागुल यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य विशद करताना शिक्षणाचे महत्त्व सांगितले याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विष्णू रंगनाथ वाघ यांनी गावातील सर्व नागरिक,विद्यार्थी आणि महिलांना वाचनालयातून मोफत पुस्तके वाचण्यासाठी मिळतील सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्याचे अभिवचन दिले यावेळी  ग्रंथपाल .अनिल शेळके , दादासाहेब शिंदे यांनी अतिशय उत्तम नियोजन केले होते उपस्थित सर्वांना नाश्ता उपलब्ध करून देण्यात आला. या कार्यक्रमास राजश्री बागुल, आशा वाघ ,अश्विनी शेळके ,सुनीता जगताप, माया खोकले, सविता शिंदे, माधुरी शिंदे, शशिकला शिंदे,प्रतिभा शिंदे, कल्पना धुमाळ, नेहा जगताप ,सुगंधा शिंदे, सुनीता पगारे, ताराबाई शिंदे, सविता मैंद ,माधुरी शिंदे,पगारे ,विद्या चक्के, संगीता पगारे, शोभा पगारे ,रत्ना पगारे ह्या उपस्थित होत्या.शेवटी सौ.सविता शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!