ब्राम्हणगाव शाळेत बालिका दिन साजरा
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ब्राम्हणगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती येथे साजरी करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ वैशाली मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्यात शाळेतील विद्यार्थिनी स्वरा सोनवणे, अमृता मोरे, आरोही सांगळे, अर्पिता केकान, कोमल पवार यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा केली होती.
सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच सौ शोभा बाळासाहेब बनकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित भाषणे केली शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाकचौरे , महेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राची माहिती दिली
तर आरोही सांगळे व तेजस बनकर या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंचा जीवनपट आपल्या भाषणामधून उलगडला शाळेच्या वतीने उपस्थित महिला भगिनींसह शाळेतील शिक्षिका मनीषा जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी मानले.








