विद्यार्थ्यांनी भविष्यातील वाटचालीचा वेध घ्यावा. -- तहसिलदार महेश सावंत
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवीन तंत्रज्ञान अवगत करुन भविष्यातील वाटचालीचा वेध घ्यावा. या मिळालेल्या नव्या क्षितीजाच्या संधीचे सोनं करावे. असे आवाहन तहसिलदार महेश सावंत यांनी केले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज महविद्यालय, कोपरगांव, दि बाॅम्बे मदर्स अॅन्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी, राजगुरुनगर, सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे वतीने उच्च माध्यमिक शिक्षण घेणा-या अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती चे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचेसाठी ए. आय. आणि रोबोटिक या विषयावर तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन कोपरगांव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महविद्यालयात करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोह कोपरगांवचे तहसिलदार महेश सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उप प्राचार्य डॉ. मोहनराव सांगळे म्हणाले, विद्यार्थींनी आपली आंतरिक शक्ती ओळखली पाहिजे.अवगत तंत्रज्ञान हे नोकरीच्या केवळ दृष्टीने न बघता ज्ञानाच्या दृष्टीने पहावे. अडथळ्यावर मात करित मोठ्या जिद्दीने शिकले पाहिजे. असे सांगितले.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य संजय शिंदे यांनी कार्यशाळेची माहिती प्रा. सागर खोडदे यांनी विषद केली. तर आभार कार्यशाळा अधिकारी प्रा. एकनाथ कळमकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे यांनी केले.
या कार्यशाळेत ग्रामीण भागातील सहभागी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना ए. आय. आणि रोबोटिक चे प्रशिक्षणातुन कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निग, कॉम्प्युटर व्हिजन डीप लर्निग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, रोबोटिक्स, सेन्सर्स चे प्राथमिक ज्ञान मिळाल्याने त्यांचे पालकांनी समाधान व्यक्त केले.



.jpg)




