banner ads

सहा हजाराच्या लाचेसाठी तलाठी अडकला जाळ्यात

kopargaonsamachar
0

सहा हजाराच्या लाचेसाठी तलाठी अडकला जाळ्यात



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 कोपरगाव येथील तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी सदनिकांची नोंद करण्यासाठी ६ हजार ५०० रुपयांची लाच घेताना नगर येथील लाच लुचपत विभागाने जेरबंद केले.


कोपरगाव तहसील कार्यालयातील  आरोपी लिपिक चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी १५ हजारांची लाच घेतल्याची घटना उघड होऊन अद्याप महिना उलटत नाही तोच आणखी एक तलाठी व त्याचा पंटर लाचेच्या जाळ्यात अडकल्याने कोपरगांव  महसुल  विभागात अद्याप बेबंदशाही सुरू असल्याचे उघड झाले असून त्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते.

कोपरगांव महसुलवर कोणाचाच वचक  नसल्याने तालुक्यातील महसुलचे कामे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या   प्रमाणात आर्थिक शोषण   होत आहे  हे असेच चालु राहीले तर यापेक्षाही अजुन मोढे मासे लवकरच गळाला लागतील अशी सर्वसामान्यांत चर्चा आहे. 

 यातील तक्रारदार इसम (वय ३७) यांनी साई सिटी या ठिकाणी एक  फ्लॅट नुकताच  विकत घेतला होता..त्याची तलाठी कार्यालयात रीतसर नोंद करणे गरजेचे असताना .त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाचे शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता.परंतु तलाठी गणेश सोनवणे याने त्यासाठी ०६ हजार ५०० रुपये ची मागणी केली होती व त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या झिरो तलाठी करण नारायण जगताप यास वसुली करण्यासाठी पाठवले होते 
तक्रारदार यांनी अहील्यानगर येथील लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला होता.व त्यांनी काल सकाळी हा सापळा लावला असता तलाठी यांचा पित्या या सापळ्यात अलगत अडकला आहे. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप याने तलाठी गणेश सोनवणे यासाठी स्वीकारलेल्या ५०० रुपयांच्या १३ नोटा हस्तगत केल्या आहेत.


दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाच लुचपत विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी भेट दिली आहे.व शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.२/२०२५ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ),१२ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक अजित त्रीपुटे हे करीत आहेत
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!