वाहनचालकांनी स्वतःबरोबरच दुस-यांची काळजी घ्यावी-अतुल गावडे
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
प्रत्येक वाहनचालकांनी वाहतुक सुरक्षिततेचे नियम पाळून स्वतःबरोबरच दुस-यांची काळजी घ्यावी असे आवाहन मोटारवाहन निरीक्षक अतुल गावडे व श्रीमती राणीताई सोनवणे यांनी केले.
नववर्षाचे स्वागत औचित्य साधुन कोपरगांव तालुक्यातील वाहनधारकासाठी पंधरवडा सुरक्षीतता शिबीर श्रीरामपुर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मागदर्शनाखाली महात्मा गांधी चॅरिटेबलच्या प्रांगणांत आयोजित करण्यांत आले होते त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते.
अतुल गावडे पुढे म्हणाले की, पालकांनी लहान मुलांच्या हातात वाहने देवु नये, वाहनधारकांनी वाहन चालवितांना भ्रमणध्वनीचा वापर करू नये, दुचाकीधारकांनी वाहन चालवितांना हेल्मेट तर चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. प्रत्येकांनी स्वयंशिस्त पाळली तर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी करू शकतो कारण प्रत्येकाचे जीवन हे अनमोल आहे.
प्रारंभी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपुरच्यावतीने कार, जीप चालकांसाठी रस्त्यावर वाहन चालवितांना कोणत्या नियमांचे पालन करावे, शिकावू वाहनचालकांनी वाहन चालवितांना कुठल्या चुका टाळाव्या याबाबतचे सचित्र मार्गदर्शन करून उपस्थित वाहनधारकांना रस्ता सुरक्षा अभियान परिपत्रकाचे विनामुल्य वाटप करण्यांत आले.
या शिबिरासाठी सुवर्णा मोटार ड्रायव्हींग, जय आनंद मोटार ड्रायव्हींग, जय जनार्दन मोटार ड्रायव्हींग स्कुलचे संचालक तसेच कोपरगांव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रतिनिधी संतोष आहेर, सुभाष लोढा, किरण मवाळ, संजय वायखिंडे, महेश पेटकर, शकील पटेल, इब्राहिम सययद, योगेश पंचमेढे, दिपक कचेरिया, योगेश हंडोरे, विकास घुगरी, किरण होन, बाबुभाई शेख, पंकज जाधव, पंकज अग्रवाल, नागेश दवंगे, सहायक विनोद गावडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले. चारशे वाहनधारकांनी यात सहभाग घेवुन सुरक्षितता जागरूकता करण्यासाठीची शपथ घेतली.








